सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सोमवारी कार्यभार घेतला. पदभार स्वीकारल्यांनंतर त्यांनी तातडीने प्रत्यक्षात कामांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. पदभार स्वीकारताना त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारपासून म्हणजेच कामाच्या पहिल्याच दिवशी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अधीक्षकांच्या सूचनेप्रमाणे पोलिसांनी जिल्ह्यात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. गेडाम यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने मटका, जुगार, दारु, गांजा विक्री असे अवैध धंदे सुरु होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनछ्या कालावधीत आणि लॉकडाऊन नंतर अवैधधंद्यांचे प्रमाण मोठ्याने वाढले होते. नूतन अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यास सुरु केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मंगळवारी दिवसभर जिल्हाभर स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनीही अवैध धंद्यांवर कारवाई केली. अधीक्षक गेडाम यांनी सर्व ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कारवाईत सातत्य ठेवून त्याचा अहवाल रोज अधीक्षक कार्यालयाला देण्यास सांगितले आहे. त्यानुसार मंगळवारी स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले.
एलसीबीने आठ ठिकाणी छापे टाकून २ जुगार अड्डे आणि ६ दारु विक्रीच्या अड्ड्यावर कारवाई केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अवैध व्यवसायांबरोबरच खासगी सावकारांवरही कडक कारवाईचे संकेत अधीक्षक गेडाम यांनी दिले आहेत. शिवाय ज्या सावकारांवर दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.