जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेअर्स खरेदीसाठी सहकार्य मिळणार : आ. मकरंद पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

किसन वीर कारखान्यांच्या या अगोदरच्या संचालक मंडळाने कारखान्यावर 1 हजार कोटीच्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. यंदाच्या चालू हंगामातसुद्धा कारखाना चालू ठेवण्याचा भोंगळ प्रयोग करून कारखान्याच्या तोट्यात वाढ केली आहे. कारखाना सुरु करायचा असेल तर भागभांडवल उभे करण्याशिवाय पर्याय नसून कवठे हे कारखान्याचे संस्थापक कै. किसन वीर यांचे गाव असून या गावाने जास्तीत जास्त शेअर्स घेऊन किसन वीर आबांच्या या कारखान्याला पुन्हा सुरु करण्याच्या कामाला गती दिली पाहिजे. जिल्हा बँक व सोसायटींच्या माध्यमातून शेअर्स खरेदीसाठी 7 वर्ष परतीच्या मुदतीवर 8% व्याजदराने सहकार्य केले जाणार असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी यावेळी सांगितले.

कवठे (ता. वाई) येथील संस्थापक किसन वीर यांच्या गावापासून भागभांडवल उभे करण्यासाठी आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील व किसन वीर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालकांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास शशिकांत पिसाळ, प्रमोद शिंदे, दिलीप पिसाळ, शिवाजी जमदाडे, उदय पिसाळ, किरण काळोखे, सरला वीर यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, पंचायत समिती उपसभापती विक्रांत डोंगरे, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, विक्रमसिंह पिसाळ, शाशिकांत पवार, अनिल जगताप, मधुकर भोसले, कांतीलाल पवार, लालासाहेब पिसाळ, ज्ञानोबा शिंगटे, अंकुश पवार. कवठे सरपंच श्रीकांत वीर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व किसन वीर कारखान्याचे उस उत्पादक सभासद उपस्थित होते.

यावेळी नूतन संचालक प्रमोद शिंदे म्हणाले, मदन भोसले व त्यांच्या संचालकांनी कारखान्यावर एका बाजूने कर्जाचा डोंगर उभा केला. तर दुस-या बाजूला कारखान्यातील एक लिटर इथेनॉल किंवा साखरेची पोती यातील काहीच शिल्लक ठेवले नाही. कर्जाच्या बाजूने व उत्पादनाच्या बाजूने पूर्ण मोकळा व खिळखिळीत करून कारखाना ठेवला आहे. कार्यक्षेत्रातील सर्वच सभासदांनी सहकारातील हा कारखाना सहकारात राखण्यासाठी जास्तीत जास्त शेअर्स घेऊन कारखाना सुस्थितीत आणण्यास सहकार्य करावे असे, आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात स्वागत सत्यजीत वीर,राहुल डेरे, संदीप पोळ, सूत्रसंचालन संदीप डेरे व विनोद पोळ यांनी केले.

Leave a Comment