ED ची नोटीस आली, सातार्‍यात पाऊस पडला अन् आपलं सरकार आलं – सुप्रिया सुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे | दीड वर्षापूर्वी कोणाला वाटलेही नव्हते की आपले सरकार येईल. सर्वांनी स्वत:च्या मनाची तयारी केली होती की आता आपले सरकार २०२४ सालीच येणार. पण इडी ची नोटीस आली, सातार्‍यात पाऊन पडला अन् आपलं सरकार आलं असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. बदलापूर येथील एका कार्यक्रमात सुळे बोलत होत्या.

प्रत्तेकजण याच तयारीत होते की २०२४ शिवाय आपलं काही नाही. ती लढाई पुर्ण ताकदीनिशी साहेब लढले नसतर तर महाविकास आघाडीची सत्ता आली नसती. नियतीच्याही मनात काहीतरी आहे म्हणुनच आपलं सरकार आले असंही सुळे म्हणाल्यात.

ED ची नोटीस आली, सातार्‍यात पाऊस पडला अन् आपलं सरकार आलं - Supriya Sule

तसेच, आजपर्यंत माझी जी ओळख आहे ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पक्ष आहे म्हणुन मला तिकीट मिळते. बारामती लोकसभा मतदार संघातील जनता मला मतदान करते म्हणुन मी लोकसभेत आहे. त्यामुळे संघटना प्रथम असं सुळे म्हणाल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment