औरंगाबाद | बोगस महिला डॉक्टरने एका रुग्णाची मुळव्याधीची शस्त्रक्रिया केल्याने त्याचे पित्ताशय फुटले आहे. रक्तस्त्राव वाढल्याने शस्त्रक्रियेनंतर आजार बरा होण्या ऐवजी आजार वाढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 15 ते 20 जानेवारी दरम्यान चिकलठाणा परिसरातील सावित्री नगरात घडला. या प्रकरणी महिला डॉक्टर विरुद्ध फसवणूक आणि वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, सावित्रीनगरात दुर्गामाता दवाखाना असून मुळव्याद, भगंदर उपचार केले जातील, असा फलक लावण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विश्वजीत दांडगे (वय – 38, रा. मयूरनगर, औरंगाबाद) हे कारचालक आहे.त त्यांना मूळव्याधीचा त्रास होऊ लागल्याने 14 जानेवारी 2019 रोजी चिकलठाण्यातील नयन ढाली यांच्याकडे गेले. तेथील महिला डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. 15 जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता दवाखान्यात शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्रास बरा होण्या ऐवजी जास्त त्रास सुरू झाला.
त्यानंतर नयन ढाली या डॉक्टरांना फोन केला असता तिचा फोन बंद आढळून आला. त्यानंतर बोगस डॉक्टरने बजाज हॉस्पिटल ला जाण्याचा सल्ला दिला. आणि मोबाईल बंद करून ती गायब झाली. त्यानंतर दांडगे यांना घाटीत दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर पोटात पित्याचे फुटल्याचे समोर आले.