मुंबई । बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज सकाळी मुंबई येथील राहत्या घरात आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सुशांतने अशी अचानक आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वानाच सतावत आहे. अशात आता सुशांतच्या ट्विटर अकाउंटवरील कव्हर फोटोत त्याच्या आत्महत्येचे रहस्य लपले असल्याचे बोलले जात आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील पोस्ट मागे काही दिवसांपूर्वी डिलीट केल्या होत्या. तसेच तो त्याच्या ट्विटर अकाऊनलाही अनेक दिवसांपासून ऍक्टिव्ह असल्याचे दिसत नाहीये. आता त्याच्या ट्विटर अकाउनवरील कव्हर फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे. Starry Night नावाचे प्रसिद्ध पेंटिंग सुशांतने त्याच्या कव्हरला ठेवले आहे. व्हिन्सेंट वॅन गॉग नावाच्या चित्रकाराने १८८९ साली वेड्यांच्या दवाखान्यात भरती असताना हे पेंटिंग बनवले होते. हे पेंटिंग बनवले तेव्हा व्हिन्सेंट प्रचंड मानसिक तणावातून जात होता. त्याच्या खोलीतून दिसणाऱ्या दृश्यातून त्याने हे चित्र रेखाटले. हे पेंटिंग काढल्यानंतर विन्सेंटने १८९० साली आत्महत्या केली. आता सुशांतच्या कव्हरवर हे पेंटिंग असल्याने तो मानसिक तणावातून जात असल्याचे बोलले जात आहे.
Analysis of #SushantSinghRajput #Twitter profile.
His cover image is a famous painting "Starry Nights" by Vincent Van Gogh.
Gogh painted Starry Night in 1889 during his stay at the asylum
when he was fighting depression.
Gogh allegedly committed suicide in 1890 pic.twitter.com/aIhVNb0peO— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 14, 2020
दरम्यान, करिअरच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या सुशांत ने अचानक आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता त्यांना काहीही संशयास्पद सापडले नाही. मात्र सुशांतच्या मृत्यूचे कारण पोस्ट मार्टेम रिपोर्टनंतरच स्पष्ट होणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई पोलिसांनी दिली आहे.
हे पण वाचा –
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमागचं कारण काय? मुंबई पोलीस म्हणतात..
लाॅकडाऊनमध्ये बागेत भुतं करतायत व्यायाम? व्हायरल व्हिडिओ पाहून पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि…
Big Breaking News | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या
अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण