मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज सकाळी मुंबई येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्या करण्यामागचे कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर आता मुंबई पोलिसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Actor Sushant Singh Rajput has died apparently due to hanging but police can tell the exact cause of his death only after receiving post mortem report. So far, we have not found any suspicious object: Abhishek Trimukhe, DCP Zone 9, Mumbai pic.twitter.com/AqKWwWpW4n
— ANI (@ANI) June 14, 2020
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये मागे काही घातपात आहे का अशी शंकाही मुंबई पोलिसांना होती. मात्र सुशांतच्या घराची तपासणी केल्यानंतर पोलिसांना काहीच संशयास्पद आढळलेले नाही. मात्र अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू फाशीमुळे झाला असावा परंतु पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे असे अभिषेक त्रिमुखे, डीसीपी झोन 9, मुंबई यांनी म्ह्टले आहे. तसेच आतापर्यंत आम्हाला कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही असंही मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
सुशांतने ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काय पो छे हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं. यानंतर सुशांतने परिणीती चोप्रासोबत शुद्ध देसी रोमांस सिनेमात काम केलं. पण त्याच्या नावाची सर्वात जास्त चर्चा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी या सिनेमातून झाली. हा सुशांतच्या करिअरमधला पहिला सिनेमा होता ज्याने १०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली होती. सोनचिडिया आणि छिछोरे या सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. सारा अली खानसोबतच्या केदारनाथ सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
हे पण वाचा –
लाॅकडाऊनमध्ये बागेत भुतं करतायत व्यायाम? व्हायरल व्हिडिओ पाहून पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि…
Big Breaking News | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या
अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण