BREAKING NEWS : ऑलम्पिक विजेता सुशीलकुमार याला अटक; ज्युनिअर पैलवानांची हत्या केल्याचा आरोप

0
56
Sushil Kumar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ऑलम्पिक विजेता सुशील कुमार याला आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणी सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांचे प्रशिक्षण होत असते. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पैलवानांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. यावेळी ज्युनिअर पैलवान सागर राणा याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुशील कुमार याच्यावर हत्येचा आरोप होता. दिल्ली पोलीस मागील १ महिन्यापासून सुशीलकुमारचा शोध घेत होती. सुशील कुमारला पकडण्यासाठी पोलिसांकडून १ लाख रुपयांचे बक्षिसहि जाहीर करण्यात आले होते. आज अखेर दिल्ली पोलिसांना यश आले असून त्यांनी दिल्ली येथे सुशीलकुमारला अटक केली आहे.

दरम्यान, सुशील कुमारने दिल्लीतील न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने जामीन फेटाळून लावला होता. या घटनेपासून सुशील कुमार फरार होता. सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here