एकनाथ शिंदे गुळाचे गणपती, महाराष्ट्राचं स्टेअरिंग फडणवीसांच्याच हाती…

0
1045
Eknath Shinde Devendra Fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पाहणी केली. त्यांचा हा पाहणी दौरा चर्चेत राहिला ते एका गोष्टीमुळे तो म्हणजे फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची दौऱ्यासाठी वापरलेली गाडी चालवण्यावरून. यावरून आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उस्मानाबाद येथील सभेतून मुख्यमंत्री शिंदे व फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा चक्क गुळाचा गणपती असाच उल्लेख केला. महाराष्ट्राचे स्टेअरिंग हे देवेंद्र फडणवीसांच्या हाती असून एकनाथ शिंदे हे नुसते गुळाचे गणपती आहेत, अशी घणाघाती टीका अंधारे यांनी केली.

उस्मानाबाद येथे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजप, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना लक्ष केले. अंधारे म्हणाल्या की, सर्व महाराष्ट्राने पाहिलं कि राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनी समृद्धी महामार्गाची गाडी चालवत पाहणी केली. यावेळी गाडीत उपमुख्यमंत्र्यांनी स्टेअरींग हाती धरले होते तर त्याच्या बाजूला मुख्यमंत्री बसले होते. अशीच अवस्था आज महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राचे स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती आहे तर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुळाचे गणपती आहे.

महाराष्ट्र भाजपने खूप राजकारण केले आहे. असेच एक राजकारण त्यांनी केली सदाभाऊ खोत यांना हाताशी धरून बगलेत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पराभव केला. राजकारण करत राजू शेट्टी यांच्यापासून सदाभाऊंना वेगळं केलं. आणि आपल्यासोबत कोपच्यात घेतलं. पण आता सदाभाऊ खोत कुठे आहे? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.