हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर , गिरीश महाजन यांनी गैरवर्तन केले. दरम्यान यासर्व आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करावं अशी मागणी आमदार अनिल परब यांनी केली होती. ती स्वीकारून त्या 12 आमदारांच 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.
विरोधी आमदारांनी मला शिवीगाळ केली. ठराव मांडण्याआधीच विरोधकांनी गदारोळ केला. काही विरोधी आमदार माझ्या वर तुटून पडले . राज्याच्या इतिहासात असं कधी झालं नाही संभागृहातील हे वर्तन लांछनास्पद असून काळिमा फासणारी आहे आहे असे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हंटल.
दरम्यान आमच्या लोकांचे शब्द चुकीचे होते हे मेनी करतो मात्र त्याच वेळी आम्ही तुमची माफी मागितली चर्चा न करता कारवाई करू नका , कारवाईचा प्रस्ताव आणू नका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले
कोण आहेत ते १२ आमदार
अतुल भातखळकर , अभिमन्यू पवार , गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंगळे , संजय कुंटे , आशिष शेलार . योगेश सागर , नारायण कुचे , जयकुमार रावल, पराग आळवणी , कीर्ती कुमार भांगडिया या आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे