कोल्हापूर प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्वेषाने पेटून उठलेल्या राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रात भाजप सरकारविरुद्ध रान उठवलं होतं. इतर विरोधी पक्षांनीही राजू शेट्टींना पाठिंबा देत आपला विरोध आणखी तीव्र केला होता. विधानसभा निवडणुक सुरू होण्यापूर्वी रविकांत तुपकर आणि इतर साथीदारांनी राजीनामा दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा अडचणीत आली होती. या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान काटे यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे झालेल्या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला.
कोल्हापूर हा ऊस पट्टा मानला जातो. या भागात स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्या कार्यकर्त्यांच्या बळावर टिकून आहे. मात्र याच कार्यकर्त्यांना आता गळती लागली आहे. या प्रवेशाचा येत्या विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इतर काही बातम्या-
आता प्लास्टिकसुद्धा सोडेना राष्ट्रवादीची पाठ; शरद पवारांच्या सभेत प्लास्टिक वापरामुळे पक्षाला १० हजारांचा दंड
वाचा सविस्तर – https://t.co/axMh9kgNrA@NCPspeaks @MumbaiNCP @AjitPawarSpeaks #pollution #PlasticFreeIndia
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
कर्नाटकातून जत ला कृष्णेचे पाणी देणार ; अमित शहा यांची ग्वाही
वाचा सविस्तर – https://t.co/cKqwjW7j92@AmitShah @AmitShahOffice @BJP4Maharashtra @BJPLive @Dev_Fadnavis #MaharashtraElections #vidhansabha
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
‘टेंभूची पुर्ती यामुळे माझा विजय नक्की’ – आमदार अनिल बाबर
वाचा सविस्तर – https://t.co/vXrMNJuIwB@ShivsenaComms @ShivSena @OfficeofUT #vidhansabha2019#MaharashtraAssemblyPolls
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019