हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कथित गैरव्यवहार संबंधित कागदपत्रे ईडी समोर नुकतीच सादर केली आहेत. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना इशाराही दिला. कारखान्यातीळ भ्रष्टाचाराप्रकरणी करण्यात येत असलेल्या चौकशीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा सोडला आहे. जरंडेश्वर कारखान्यासोबत ४३ कारखाने आहेत मग फक्त जरंडेश्वरच टार्गेट का?, असा प्रश्न शेट्टी यांनी सोमय्या यांना विचारला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील सध्या जरंडेश्वर कारखान्यासोबत ४३ कारखाने आहेत. मग फक्त जरंडेश्वरच टार्गेट का?, हे साखर कारखाने शेतकऱ्यांना मिळणार का? गैरसोयीच्या माणसाचं बाहेर काढायचं अन् सोयीच्या माणसाचं झाकून ठेवायच ही पद्धत सध्या सुरु आहे, असे शेट्टी यांनी म्हंटले.
मी यापूर्वीही अनेकवेळा सांगत आलेलो आहे कि राज्यात ज्या ज्या सहकारी साखर खरखान्यात गैरव्यवहार झालेला आहे. त्या कारखान्यांची यादी फार मोठी आहे. त्यांची चौकशी करण्यात यावी. सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत. जे कारखाने एकरकमी एफआरपी देणार नाहीत ते कारखाने चालू देणार नाही”, असा इशारा शेट्टी यांनी दिला.