“नरेंद्र मोदी स्वत: राजकारणामधून संन्यास घेत आपले पंतप्रधानपद सोडतील”; ‘या’ व्यक्तीने केले भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महत्वाची व्यक्ती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून अनेक धाडसी निर्णयही घेतले आहरेत. त्यांच्या पंतप्रधान पदाबाबत अनेकवेळा अनेकांनी भाकीत केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपद सोडतील आणि त्यांच्या जागी भाजपची प्रमुख व्यक्ती त्या पदावर बसेल. ती व्यक्ती आणि पंतप्रधान मोदी कधी पद सोडतील, असे महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी भाकित केले आहे.

नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या या राज्यात पंजाब वगळता इतर चार राज्यात भाजपा मोठे यश मिळाले. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील निवडणुकीनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल भविष्यवाणी केली आहे. राष्ट्रवादाच्या नावावर पंतप्रधान मोदी स्वत: पंतप्रधानपद सोडतील आणि ही जबाबदारी एखाद्या योग्य व्यक्तीकडे सोपवतील, असे महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी म्हंटले आहे.

महामंडलेश्वरर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या आधारे भविष्यवाणी केल्यास १२ वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. 12 वर्ष हे पद भूषवल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणापासून दूर जातील. आणि योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदीनंतर पंतप्रधान होतील. नरेंद्र मोदी स्वत: राजकारणामधून संन्यास घेतील. या माध्यमातून ते एक आदर्श सर्वांसमोर ठेवतील ज्यामधून ते राजकीय इतिहास घडवतील, असे स्वामींनी म्हंटले आहे.