हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup 2022 : यंदाचा आयसीसी टी-20 विश्वचषक आता निर्णायक टप्प्याकडे सरकला आहे. आता या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चार संघांची नावे देखील निश्चित झाली आहेत. यावेळी भारत, न्यूझीलंड,इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. या स्पर्धेचे यजमान असलेल्या ऑस्ट्रेलियासहीत अनेक मोठ्या संघांचा खेळ पावसाने खराब केला आहे. यामुळे जर आता उपांत्य आणि अंतिम फेरीत पावसाने व्यत्यय आणला तर विजेता कसा ठरवला जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
हे लक्षात घ्या कि, या वेळीच्या टी-20 विश्वचषकाच्या ग्रुप 1 मधून न्यूझीलंड आणि इंग्लंडने तर ग्रुप 2 मधून भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. यामध्ये पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा सामना भारताविरुद्ध होणार आहे. T20 World Cup 2022
उपांत्य फेरीत पाऊस पडला तर अशा प्रकारे ठरविला जाणार विजेता
जर उपांत्य फेरीमध्ये पाऊस पडला तर ??? या एकाच गोष्टीची चिंता आता सर्वांना सतावते आहे. हे लक्षात घ्या कि, आयसीसीकडून सर्व बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला गेला आहे. याचा अर्थ असा कि, जर पावसामुळे सामना 9 तारखेला खेळला गेला नाही तर तो सामना 11 तारखेला पूर्ण केला जाईल. मात्र जर राखीव दिवशीही पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावलेला संघ पुढे जाईल. T20 World Cup 2022
पावसाने अंतिम सामना धुऊन काढला तर अशा प्रकारे ठरविला जाणार विजेता
आता भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये अंतिम सामना होणार असल्याची चर्चा चाहत्यांच्या मनात रंगू लागली झाली आहे. मात्र जेव्हा हे दोन्ही संघ आपापले उपांत्य फेरीचे सामने जिंकतील तेव्हाच असे होणे शक्य आहे. तसेच, अंतिम सामना राखीव दिवशीही होऊ शकला नाही तर आयसीसीच्या नियमांनुसार अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन संघांपैकी आपल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावलेला संघ विजेतेपदावर नाव कोरेल. T20 World Cup 2022
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cricbuzz.com/cricket-series/3961/icc-mens-t20-world-cup-2022/matches
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा