दुबई । केएल राहुलने शुक्रवारी दुबईच्या मैदानावर तुफान खेळी केली. त्याने स्कॉटलंडविरुद्ध 19 चेंडूत 50 धावा ठोकल्या. त्याच्या या वेगवान खेळीच्या जोरावर भारताने स्कॉटलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. या विजयामुळे टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. भारताच्या विजयासोबतच राहुलच्या वेगवान फलंदाजीचीही सर्वत्र चर्चा होत आहे. राहुल ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यावरून क्षणभर असे वाटत होते की तो युवराज सिंगचा 14 वर्षांचा जुना विक्रम मोडेल. मात्र राहुल चुकला.
2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध डरबनच्या मैदानावर अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याच सामन्यात स्टुअर्ड ब्रॉडच्या एकाच षटकात त्याने 6 षटकार ठोकले. आजही तो ऐतिहासिक क्षण पाहून लोकं थक्क होतात. गेल्या 14 वर्षांपासून युवराजने टी-20 मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या या विक्रमावर राज्य केले आहे.
राहुलची खेळी
केएल राहुलने स्कॉटलंडविरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. म्हणजेच युवराज सिंगपेक्षा 6 चेंडू जास्त. राहुलने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले. म्हणजेच त्याने चौकारांद्वारे एकूण 42 धावा केल्या तर युवराज सिंगने 6 षटकार आणि 3 चौकार लगावले होते. म्हणजेच चौकार मारत त्याने 48 धावा केल्या. युवराजने अवघ्या 2 धावा पळून केल्या. तसे, राहुल आता T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा दुसरा भारतीय बनला आहे.
फलंदाज महान
अफगाणिस्तानचा नेट रनरेट प्लस 1.481 ला मागे ठेवण्यासाठी भारताला 481 धावांचे लक्ष्य 1 षटकात गाठायचे होते. केएल राहुल आणि रोहित शर्माने पहिल्या पाच षटकातच 70 धावा केल्या. राहुलने 19 चेंडूत 50 तर रोहितने 16 चेंडूत 30 धावा केल्या. भारताच्या पहिल्या चार षटकांतच 50 धावा झाल्या, जे या स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक आहे. या दोघं भारतीय फलंदाजांनी मिळून 11 चौकार आणि चार षटकार ठोकले.