सिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात? खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका

देशाच्या माजी गृहमंत्र्यांना पराभूत करून थाटात सोलापूरची खासदारकी मिळवलेल्या सिद्धेश्वर महाराज यांची खासदारकी धोक्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जातीचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी जयसिद्धेश्वर महाराज यांना खासदारकी गमवावी लागू शकते. यासंदर्भातील गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून १८ जानेवारीला यासंदर्भातील योग्य ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश सिद्धेश्वर महाराज यांना देण्यात आले आहेत.

भंडारकवठे खून प्रकरण; आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलांनी काढला काटा

दारू पिऊन आपल्या आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलांनीच कु-हाड आणि विळयाने गळा कापून आपल्या वडिलांचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पत्नी आणि दोन मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मतिमंद महिलेवर लैंगिक अत्याचार; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एका मतीमंद महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी या या घटनेतील संशयित आरोपी म्ह्णून एकाला ताब्यात घेतला आहे. अर्जून दिगंबर शितोळे असं या संशयित आरोपीचं नाव आहे.

राष्ट्रवादीचा मोहिते पाटील गटाला दणका, ६ जि.प. सदस्यांची पक्षातून हकालपट्टी

सोलापूर प्रतिनिधी | भाजप सोबत जवळीक साधणार्‍या मोहिते पाटील गटाला राष्ट्रवादीने दणका दिला आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीमध्ये भाजपला मतदान करणार्‍या मोहिते पाटील गटातील सहा जि.प. सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहा जि.प. सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. सदर सहा जि.प. सदस्य हे मोहिते पाटील गटातील … Read more

पंढरपुरात मृतांच्या रक्षेची होतेय चोरी; सोन्याच्या हव्यासापोटी मृताची विटंबना

सोन्याच्या हव्यासापोटी सोलापूर जिल्हयातील पंढरपूरमध्ये चक्क मृतांच्या रक्षा चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसत आहेत. येथील स्मशानभूमीत मृत व्यक्तीच्या अंगावरील सोन्याचे दागिणे मिळवण्यासाठी चोरांनी चक्क रक्षा चोरीचा फंडा अवलंबला आहे. वाढत्या रक्षा चोरीमुळे मृताची विटंबना केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण नीर्माण झाले आहे.

महाराष्ट्र केसरी : सोलापूरला २ तर उस्मानाबादला १ सुवर्णपदक

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची शनिवारच्या सकाळच्या सत्रात सुरुवात ५७ व ७९ किलो वजनी गटातील गादी विभागातील अंतिम फेरीने झाली. म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे (५७ … Read more

प्रणिती शिंदेंच्या मंत्रिपदासाठी युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन

महाविकासआघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याच्या पदरी निराशाच पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळातून जाणीवपूर्वक जातीपातीच राजकारण करून डावलण्यात आलं असा आरोप प्रणिती शिंदे समर्थकांकडून केला जात आहे. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असूनही याची दखल प्रदेश पातळीवरून घेण्यात आली नाही.

मंगळवेढा पंचायत समितीवर अवताडे गटाचे वर्चस्व; सभापतीपदी प्रेरणा मासाळ

राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडत आहेत. सोलापूरमधील बाजार समितीसाठीही एक दिवसापूर्वीच निवडणूक पार पडली होती. मोठ्या तालुक्यांच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असं चित्र रंगत असताना मंगळवेढ्यात मात्र अवताडे गट विरुद्ध बाकी अशी लढत रंगल्याचं पहायला मिळालं.

परदेशात जाण्याची ओढ असलेल्या राहुल गांधींना सावरकर कळणार नाहीत- माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे

काही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावकार यांच्यावर टीका केली होती. या टिकेमुळं राहुल गांधी यांच्यावर भाजपने जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. राष्ट्रीय तसेच राज्यातील अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. याच संदर्भात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आता राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

सोलापूरकरांनी अनुभवलं ‘खंडग्रास सूर्यग्रहण’, सोलापूर विज्ञान केंद्राकडून आयोजन

आज खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये सोलापूर विज्ञान केंद्राकडून सोय करण्यात आली होती. यावेळी सोलापूरकरांनी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने गर्दी केली हो