कोल्हापूरात वैद्यकीय सेवेतील सर्वांना मिळणार ‘कॉटन मास्क’

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्हयातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स आदी सर्वांना मास्क देणार असल्याची ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीपीआरमधील कोरोना स्वतंत्र कक्षाला खासदार माने यांनी भेट देऊन रुग्णांना पुरविण्यात येणाऱया वैद्यकीय सेवा व सुविधांचा आढावा घेतला याप्रसंगी ते बोलत होते. मास्कच्या उपलब्धतेसाठी इचलकरंजीतील गारमेंट … Read more

जिल्ह्यात परदेश दौऱ्यावरून येणाऱ्या व्यक्तींनी होम कोरोन्टाईन करून घ्यावे- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर परदेश तसेच जिल्ह्याबाहेरुन प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्या, आलेल्या नागरिकांनी स्वत: आरोग्य तपासणी करून 14 दिवस घरीच स्वत:ला होम कोरोन्टाईन करून घेवून घरामध्ये सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून आवश्यक उपाययोजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या … Read more

सुरेश प्रभू यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह ; मात्र तरीही एकांतवासात रहाण्याचा निर्णय

भाजपाचे खासदार आणि माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आपली कोरोना चाचणीकरून घेतली मात्र त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

सैन्यातील जवानाला कोरोनाने घेरले ; सुट्टी संपून नुकताच सेवेवर झाला होता रुजू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यात आता लष्करामधील एका जवानालाही करोना विषाणू संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सैन्यातील जवानांना या आजाराची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. लेहमध्ये हा जवान तैनात असून तो सुट्टी संपून नुकताच सेवेत रुजू झाला होता. सुट्टीवर असण्याच्या काळातच त्याला कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. या जवानाचे … Read more

कोरोना नाही तर ‘या’ कारणामुळे बँका पुढच्या आठवड्यात चार दिवस बंद

दिल्ली | संप आणि सुट्ट्या यांच्यामुळे पुढील आठवड्यात बँका केवळ तीनच दिवस सुरु राहणार आहेत. १० पीएसयू बँकांच्या चार मोठ्या बँकांमध्ये मेगा विलीनीकरणाच्या योजनेचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (AIBEA) आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेने (AIBEO) २ मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. द बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियानेही सदर संपात … Read more

गादीवर झोपा, कोरोना दूर! दणक्यानंतर जाहिरातच भुर्रss

मुंबई | आमच्या कंपनीच्या गादीवर झोपा, कोरोना दूर होईल, अशी जाहिरात करणाऱ्या एका कंपनीला मुंबई ग्राहक पंचायतने चांगलाच दणका दिला आहे. ‘कोरोनावर गुणकारी गादी’, अशी जाहिरातबाजी करणाऱ्या या कंपनीला सदर जाहिरात मागे घेणे भाग पडले आहे. भारतीय जाहिरात मानांकन परिषदेकडे ‘एएससीआय’ मुंबई ग्राहक पंचायतच्या डॉ. अर्चना सबनीस यांनी याबाबत तक्रार केली होती. सध्या कोरोनामुळे सगळीकडे … Read more

‘कोरोना’ वरच्या लसीचे अधिकार विकत घेण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्याविरुद्ध जर्मनीत संताप

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर लस शोधली आहे अशी माहिती जर्मनीने दिल्यानंतर या लसीचे हक्क विकत घेण्यासाठी जर्मनीच्या कंपनीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी रकम देऊ केल्याबद्दल जर्मनीत ट्रम्प यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येतो आहे. याबाबत जर्मनीच्या ‘वेल्ट अ‍ॅम सोनटॅग’ या वृत्तपत्राने पहिल्या पानावर “ट्रम्प विरुद्ध बर्लिन” शीर्षकाने वृत्त प्रकाशित केले आहे. … Read more

भारतातील कोरोना तपासणी लॅबोरेटरींची संख्या ६३ वर, ९ नवीन तपासणी केंद्र प्रस्तावित

भारतात कोरोनाविषयक तपासणी केंद्रांची संख्या वाढून ती ६३ झाली आहे. आणखी ९ नवीन केंद्र प्रस्तावित आहेत.

चांगली बातमी! गेल्या २४ तासात सापडला फक्त एक कोरोना रुग्न

पुणे | कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्नांची संख्या १२७ वर पोहोचली आहे. अशात महाराष्ट्रात कोरोना रुग्नांची संख्या ४० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात पुण्यातकेवळ १ कोरोना रुग्न सापडला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात सापडले आहेत. पुण्यातील कोरोना रुग्नांची संख्या आता १७ वर पोहोचली आहे. मात्र गेल्या २४ तासांत … Read more

पुण्यात कोरोना रुग्नांची संख्या १७ वर, विभागीय आयुक्तांची माहिती

पुणे प्रतिनिधी | शहरात महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना रुग्न सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. आता पुण्यातील कोरोना रुग्नांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त म्हैसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज पिंपरि चिंचवड येथे नवीन कोरोना रुग्न सापडल्याचे म्हैसकर यांनी सांगितले. सदर युवक अमेरिकेहून प्रवास करुन आला होता. येताना त्याचे विमान दुबईहून … Read more