कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत कोल्हापूरात महिला दिन उर्त्स्फुतपणे साजरा होईल-मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर राज्यस्तरीय महिला दिनाची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता आणि खबरदारी घेवून उद्या कोल्हापूरात महिला दिन उर्त्स्फुतपणे साजरा होईल असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमास सुमारे 40 ते 50 हजार महिला … Read more

कोरोनामुळं औरंगाबाद पालिकेचा मुशायरा रद्द; पोलिसांची संगीत रजनी मात्र रंगणार

औरंगाबाद प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात कुठेही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे ८ मार्च रोजी मनपाने आयोजित केलेला मुशायरा रद्द केला आहे. परंतु, त्याच शहरात पोलिस आयुक्तांनी पोलिस कल्याण निधीसाठी आयोजित केलेला संगीत रजनी कार्यक्रम मात्र होणार असल्याचे जाहीर केले आहे.यावरून नागरिकांच्या आरोग्याचे पोलिस विभागाला काही देणे-घेणे नाही, असे … Read more

कोरोनामुळे बाजारात ‘एन-९५’ मास्कची मागणी वाढली; महागड्या मास्कची गरज नसल्याचं डॉक्टरांचं मत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना’ व्हायरसचे रुग्ण भारतातही सापडल्याने राज्यासह जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. इराण आणि हाँगकाँगमधून आलेल्या जिल्ह्यातील २ व्यक्‍तींची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. मात्र नागरिक चांगलेच सतर्क झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे बाजारात एन-९५ मास्कची मागणी वाढली आहे. आणि या मास्कची … Read more

कोरोना आणि होळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात ‘करोना’ व्हायरसने थैमान घातलं असताना महाराष्ट्रात पसरलेल्या भीताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत निवेदन केलं. ‘राज्यात चिंतेचं वातावरण नाही, मात्र, काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजना केल्याचं आहेत. पण नागरिकांनीही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. गरज नसताना गर्दी करू नका आणि धुळवडही मर्यादेत … Read more

इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाचा संसर्ग; रुग्णांची आयटीबीपीच्या छावणीत रवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीमध्ये अनेकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे इटलीहून आलेल्या पर्यटकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चाचणी करण्यात आलेल्या २१ पैकी १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. सर्व पर्यटकांना हरयाणातल्या छावलामधील आयटीबीपीच्या छावणीत रवानगी करण्यात आली आहे. … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी कोरोना ग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची घेतली भेट

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी इराणमधील कोरोना ग्रस्त तेहरान येथे महाराष्ट्रातील 44 लोक अडकले असुन अडकलेल्या यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे. तसेच चव्हाण त्यांच्या मदतीची मागणी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी इराणच्या तेहरान येथील परिस्थितीची माहिती घेऊन यात्रेकरूंच्या सुटकेसाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करु अशी ग्वाही यात्रेकरूंच्या नातेवाईकांना दिली आहे. दरम्यान … Read more

‘कोरोना’ व्हायरसने फास आवळला,चीनमधील मृत्यूंची संख्या १ हजार पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मागील महिनाभरापासून जगात दहशत माजवलेल्या कोरोना विषाणूने सर्वांनाच हादरवून सोडलं असून कोरोनो व्हायरसमुळे चीनमधील मृतांचा आकडा १० तारखेपर्यंत एक हजारांच्या वर गेला आहे. चीनमध्ये ठराविक काळाच्या अंतरात एखाद्या आजाराने लोकांचा बळी जाण्याचा हा दुर्दैवी विक्रम असून यामुळेच चीनमधील आरोग्यव्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. विमानतळावर या आजाराची लागण होऊ नये म्हणून … Read more

अभिमानस्पद! भारतीय शास्त्रज्ञाने शोधला ‘कोरोना’ विषाणूवरील जालीम उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळ चीनमध्ये आतापर्यंत करोनाने ६१८ जणांचे बळी घेतले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. दरम्यान, शास्त्रज्ञांच्या मेहनतीला यश मिळाल्याची सुखद वार्ता ऑस्ट्रेलियामधून मिळत आहे. करोना विषाणूवर लस बनवण्याच्या अगदी जवळ गेल्याचा एका शास्त्रज्ञाने दावा केला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियातील … Read more