लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींकडून ताब्यात – पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

Pruthviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकशाहीच्या सर्व संस्था ताब्यात घेतल्या असून या संस्था त्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे दिसते आहे असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच त्यामुळे घटनेत अभिप्रेत असणारा न्याय लोकांना मिळणार का अशी शंका जनतेमध्ये निर्माण झाल्याचे मत देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. … Read more

सरकारमध्ये नाराजी आहे ; पण…. संजय राऊतांचा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज लोक असतातच. इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. त्यात नाराजी आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे, पण तरीही सरकार टिकेल,’ असा ठाम विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री त्या परिस्थितीत होणे ही तोकड्या तलवारीची लढाई होती’, असं … Read more

पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले ; संजय राऊतांनी सांगितला सत्ता वाटपाच्या बैठकीतला किस्सा

Raut and Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी आघाडी करून राज्यात प्रथमच महाविकास आघाडीची स्थापना होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सत्ताधारी व विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या आघाडीचे एक शिल्पकार असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी सरकारच्या … Read more

पुन्हा कधी भाजपसोबत जाणार नाही का? ; आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात खूप मोठी राजकिय उलथापालथ झाली. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजप हे मित्र एकमेकांचे शत्रू बनले आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते व्हावं लागलं. आता येत्या काळात पुन्हा भाजप सोबत जाणार का असा … Read more

मंत्रिमंडळाची सुरुवात U नेआणि शेवट A ने ; उलट्या बाराखडी प्रमाणे कामही उलटसुलट – मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने भाजप कडून ठाकरे सरकार वर जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. “या सरकारच्या मंत्रिमंडळाची सुरुवात U अक्षराने आणि शेवट A ने आहे. यांची … Read more

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांवर बरसले ; उद्धव ठाकरेंवर केले ‘हे’ 8 आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने भाजप राज्य शासनाची पोलखोल करत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेउन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी बोचरे वार करत येणाऱ्या काळातला भाजपचा इरादा स्पष्ट केला. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही ; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला. “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट … Read more

नारायण राणे म्हणजे गंजलेली तोफ ; जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

Narayan Rane Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार हे सक्षम असून यशस्वीपणे काम करत आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे सरकारवर आराेप करत सुटले आहे. परंतु नारायण राणे हे गंजलेली ताेफ आहे. गंजलेल्या तोफेतून आलेल्या गाेळ्यांना आम्ही महत्त्व देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टाेला लगावला … Read more

महाविकास आघाडीचे 1 वर्ष पूर्ण झाले, अजून 4 वर्ष नक्कीच पूर्ण होतील – शिवसेनेला विश्वास

mahavikas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीवर भाष्य करताना शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला खडेबोल सुनावले आहे. “विरोधी पक्ष मंत्रालयाच्या पायरीवर वर्षभरापासून उभा आहे व पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल. पायरी खचेल, पण तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार नाही. भारतीय जनता पक्षाने हे सरकार … Read more

उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची शरद पवारांची भूमिका होती ; नवाब मलिकांनी फेटाळला पुस्तकातील ‘तो’ दावा

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध राजकीय लेखिका प्रियम गांधी यांचं ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणूकी नंतर राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन करणार होते असा धक्कादायक खुलासा या पुस्तकातून करण्यात आला आहे. परंतु भाजप नेते नवाब मलिक यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळला आहे. हे पुस्तक पूर्णपणे माजी मुख्यमंत्री … Read more