सोलापुरातील कोरोना रुग्णवाढीला शरद पवार, सुशीलकुमार शिंदेच जबाबदार- संतोष पवार 

सोलापूर । सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२१७ झाली आहे. १०० च्या जवळपास रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागला आहे. जिल्ह्यातील या सर्व परिस्थितीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेच जबाबदार असल्याचे भाजपा नेते संतोष पवार यांनी म्हंटले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शरद पवार … Read more

बाबा आढाव हे एक चिवट आणि निडर चळवळ्या नेते – शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झोपड्पट्टीधारक, हमाल, कष्टकरी यासारख्या असंघटीत कामगारांसाठी आयुष्य वेचणारे बाबा अशी ओळख असणारे नेते बाबा आढाव यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट ‘हमालांच्या कल्याणासाठी हिमालायाइतके कष्ट उपसणाऱ्या हिम्मतवाल्या बाबा आढावांना निरोगी दीर्घायू मिळावे म्हणून वाढदिवसानिमित्त माझ्या मनपूर्वक शुभेच्छा!’ अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. पवार … Read more

शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना आता तिसरं पत्र; म्हणाले..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एक पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या संकट काळात पवारांनी मोदींना लिहिलेलं हे तिसरं पत्र आहे. या पत्रात पवारांनी कोरोनामुळे बांधकाम व्यवसायावर आलेल्या संकटासंदर्भात मोदींचे लक्ष वेधले आहे. कोरोनामुळे मागील ३ महिन्यांपासून देशातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले … Read more

शरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय? राम कदमांचे सरकारवर ताशेरे

मुंबई । महाराष्ट्र सरकार निष्फळ आहे असे अनेक भाजपा नेते यांनी याआधी विविध माध्यमातून मांडले आहेच. आता त्यामध्ये भाजपाचे वादातीत नेते आणि घाटकोपर पश्चिम चे आमदार राम कदम यांचीही भर पडली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इथे अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना तुम्हांला खुर्चीचा कसला विचार पडतो … Read more

राज्यात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चेवर शरद पवार म्हणाले..

मुंबई । भाजपकडून राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या भाजपच्या हालचालींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ठाकरे सरकारच्या पाठीशी मजबूत उभे आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी-शिवसेना … Read more

राष्ट्रपती राजवटीची कुणकुण लागताच शरद पवार मातोश्रीवर; संजय राऊत म्हणतात..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. पवार ठाकरे भेट हि अतिशय गुप्तपणे पार पडली आणि त्यांच्यात २ तास चर्चा झाली अशी माहिती आज … Read more

शरद पवार राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनीच पवार यांना भेटीचे आमंत्रण दिले असल्याचे समजत आहे. पवार नुकतेच राजभवन मध्ये पोहोचले असून त्यांच्यात चर्चा आहे. सध्या राज्य सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्ष नेते वारंवार राज्यपालांची भेट घेऊन … Read more

मी लुक्क्यांना धमकी देत नाही; निलेश राणेंचे रोहित पवारांवर पुन्हा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश राणे त्यांच्या ट्विटर च्या पोस्ट मुळे या काळात चांगलेच चर्चेत आले आहेत. आपल्या विशिष्ट शैलीमुळे त्यांचे ट्विट चांगलेच गाजते आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात केलेल्या ट्विटमुळे त्यांनी तृतीयपंथीयांचा रोष ओढावून घेतला होता. नंतर त्यांना माफीही मागावी लागली. आता त्यांनी आमदार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार … Read more

मुंबई लोकल सुरु करा! शरद पवार, उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी बोलणार

मुंबई । राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत एकमत झाले. किमान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी लोकल सेवा सुरु करावी, असे बैठकीत निश्चित झाले. त्यानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार केंद्रीय … Read more

उद्धव ठाकरेंचा ‘हा’ फोटो शेअर करून नितेश राणेंनी उडवली खिल्ली 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट मुळे नितेश राणे सतत चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंट सतत काहीतरी शेअर करून ते वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. आता आणखी एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सार्वजनिक रित्या खिल्ली उडवली आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून एक संपादित फोटो शेअर केला … Read more