तारापूर एमआयडीसीमधील नाईट्रेट कंपनीत भीषण स्फोट; मालकासह ८ जण ठार

तारापूर एमआयडीसीमधील एम२ प्लॉटमधील तारा नाईट्रेट या नावाने ओळखली जाणाऱ्या कंपनीत संध्याकाळी ६.५० च्या सुमारास भीषण स्फोट झाला असून या अपघातांमध्ये कंपनीच्या मालकासह ८ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की आसपासचा १० ते १५ कि.मी. चा परिसर हादरला.

ताफा थांबवून मुख्यमंत्री धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

राजकीय नेत्यांमध्येही माणुसकी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कृतीतून दिसून आला. गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर जात होते. याप्रवासात पोंडा शहरापासून ३५ किमी असलेल्या खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. यावेळी पेशाने डॉक्टर असलेल्या सावंत यांनी आपला ताफा थांबवून प्रोटोकॉल तोडत अपघातग्रस्त जखमी युवकाला मदत केली.

थंडीपासून संरक्षणासाठी चुलीसमोर बसलेल्या महिलेचा जळून दुर्दैवी मृत्यू

परभणी जिल्ह्यातील गारठून टाकणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरातील चुलीसमोर बसलेल्या महिलेच्या साडीने अचानक पेट घेतल्याची दुर्दैवी घटना नववर्षाच्या सायंकाळी पाथरी तालुक्यात घडली. याघटनेत महिलेचा परभणीत उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.

पाय घसरल्याने डोंगरावरून पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू;पोलीस होण्याचे स्वप्न राहिले अर्धवटच…

पोलीस खात्यात भरती होण्यासाठी मैदानी सराव करण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीचा पाय घसरून ती 100 फूट खोली पडली.

उसाचा ट्रॅक्टर – सुमो गाडीचा भीषण अपघात; ५ जण गंभीर जखमी

उसाने भरलेल्या टॅक्टरला सुमो गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

४ थ्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू;कामगार सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यालगत असलेल्या इमारतीचे रंगकाम करणाऱ्या कामगाराचा चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात क्रांती चौक पोलीस ठाण्यात हा घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सहलीसाठी आलेल्या विद्यार्थिनींच्या बसला अपघात; ११ विद्यार्थिनींसह ३ शिक्षक जखमी

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस  रस्त्याच्या कडेला असलेल्या घड्ड्यात गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

उसतोड मजुरांच्या टेम्पो ट्रकला भीषण अपघात, ७ ठार १५ जखमी

उस्मानाबाद येथे मजूर घेऊन जाणारी गाडी धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील पुलावरून खाली कोसळली. त्यामुळे अपघात होऊन ७ ठार १५ जखमी झाल्याचे वृत्त आहे. पहाटेची घटना जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मजुरांना घेऊन जाणारी पिकअप व्हँन नदी पाञात पडुन ७ ठार , 13 जण जखमी

राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वर मध्यराञी भिषण अपघात झाला.सेंधव्याहुन मजुरांनी भरलेला टेम्पो हा शिरुड चौफुली जवळील पुलावरुन नदी पाञात पडुन 7 जण ठार तर 13 जण जखमी झाले. मजुरीसाठी जाणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला

दिवेघाट अपघातातील वारकऱ्यांना अद्याप मदत नाही

नामदेव पालखी सोहळ्यात जेसीबी घुसल्याने दिवेघाटात झालेल्या अपघातातील जखमींवर उपचार केले जातायत, मात्र  शासनाने देऊ केलेली आर्थिक मदत अजूनही न पोचल्याने वारकऱ्यांना अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे.