दिवेघाटात जेसीबी दिंडीत घुसला, नामदेव महाराजांच्या वंशजाचं दुःखद निधन

पंढरपूरवरुन आळंदीकडे येणाऱ्या नामदेव महाराजांच्या पालखी दिंडीला मंगळवारी सकाळी भीषण अपघाताला सामोरं जावं लागलं. या अपघातात २ जण ठार, २ जण गंभीर जखमी तर १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. दिवेघाटात झालेल्या या अपघातात नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास, वय ३६ हे जागीच ठार झाले आहेत. त्यांचे सहकारी अतुल महाराज आळशी, वय २४ यांनाही आपला जीव या अपघातात गमवावा लागला आहे. या अपघातात जेसीबीचंही मोठं नुकसान झालं आहे.

अक्कलकोटजवळ स्कोर्पिओ ट्रकचा अपघात, मुंबईतील तीन जण जागीच ठार

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर अक्कलकोट महामार्गावर अक्कलकोटजवळ स्कोर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास अक्कलकोट जवळ स्कोर्पओ आणि ट्रक यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये स्कोर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला आहे तर गाडीतील तीन जण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान अपघातातील … Read more

भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा करुण अंत

मध्य प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रीय स्तरावरील चार हॉकीपटूंना प्राण गमवावे लागले, तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. ध्यानचंद्र ट्रॉफी खेळण्यासाठी जाताना हा अपघात घडला. मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ आज (सोमवारी) सकाळी हा अपघात झाला.

घोडबंदर रस्त्यावर भीषण अपघात; मायलेकी जागीच ठार

ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या अपघातातील महिलेच्या पतीची प्रकृती ही अतिशय गंभीर आहे.

कृष्णेत बुडालेल्या परप्रांतीय तरुणाचा मृतदेह सापडला

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे सांगलीतील कृष्णेच्या पत्रामध्ये आज दुपारी दोन दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या एका परप्रांतीय युवकाचा मृतदेह आढळला. सुवेन्दु बेडा असे मयत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री विश्वकर्मा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर तो गेला असता पाय घसरून बुडाला होता. कलकत्ता येथील हुबळी जिल्ह्यातील सुवेन्दु बेडा हा २५ वर्षीय युवक सांगलीतील एक सराफी दुकानात कारागीर … Read more