सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी नगरसेवकांना ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा व दंड

Court

औरंगाबाद – उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या गुन्ह्यात एमआयएमचे माजी नगरसेवक सलीम पटेल दौलत पटेल व शेख मकसूद अन्सारी शेख बाबामियाँ या दोघांना सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ची शिक्षा ठोठावली. याविषयी अधिक माहिती अशी की, तत्कालीन … Read more

निजामाच्या विचारांच्या लोकांना मराठवाड्यातील लोक महापालिकांमध्ये निवडून देतात हे दुर्दैव

jitendra awhad

औरंगाबाद – मराठवाडा हा प्रदेश लढाऊ आहे. या भागातील लोकांनी लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले. अत्याचारी पाचवी निजामाचा पराभव केला. कासिम रझवीच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्यांना आज मराठवाड्यातील लोक महानगरपालिकांमध्ये निवडून देतात. हे दुर्दैवी असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘एमआयएम’चे नाव न घेता केली. लोकसंवाद फाउंडेशन आयोजित 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात गृहनिर्माण … Read more

मनपा निवडणूकीच्या तोंडावर एमआयएमला आणखी एक ‘झटका’

aurangabad mahanagar

औरंगाबाद – एमआयएमने औरंगाबाद मनपाच्या 2015 मधील निवडणुकीत 115 पैकी तब्बल 24 जागा मिळवून, शहरातीलच नव्हे तर राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केले होते. परंतु, आता या वादळाची तीव्रता कमी होत चालल्याचे प्रचिती येत आहे. अलीकडेच एमआयएम पक्षातील दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ आता रोशन गेट वॉर्डाच्या माजी नगरसेविका साजेदा सईद फारूकी यांनी … Read more

खासदारांची ‘पद्म’ पुरस्कारासाठी शिफारस करू; शिवसेनेची उपहासात्मक टीका

Imtyaj jalil

औरंगाबाद – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनावरून शिवसेना-एमआयएममध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मराठवाड्याचा अनुशेष भरून काढल्याबद्दल मुक्तीसंग्रामदिनी तुतारी वाजवून उपरोधक स्वागत केले जाईल, असे जाहीर केले आहे. त्याला शिवसेनेकडून चोख उत्तर दिले असून, शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी तुम्ही गुटखा हद्दपार केला, दारूचे अड्डेही बंद केले. या … Read more

स्वातंत्र्य दिनी काळे झेंडे दाखवणे आले अंगलट; खासदारांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

kale zende

औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी ‘माझे विद्यापीठ परत द्या’ या मागणीसाठी दिल्ली गेट येथे स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवले होते. याप्रकरणी खासदारांसह 24 पदाधिकाऱ्यांवर सिटी चौक पोलिस ठाण्यात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबादला होणारे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी … Read more

स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणास आलेल्या पालकमंत्र्यांना एमआयएमने दाखवले काळे झेंडे

kale zende

औरंगाबाद – शहरात प्रस्तावित व जागा निश्चित झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाविकास आघाडी सरकारने राजकीय हेतुपोटी दबावाखाली पुणे येथे हलवून मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. खासदार जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. क्रीडा विद्यापीठ सुरु झाले असते तर मराठवाड्यातील गुणवंत खेळाडूंना याचा … Read more

आम्हाला नुसती इफ्तारची दावत, तोंडात खजूर? आम्ही काय भिकारी आहोत का?”;ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत लोकसभा व राज्य सभेचे संसदीय अधिवेशन पार पडले. यावेळी एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम आरक्षणावरुन ठाकरे व मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “तुम्ही मते मिळवाल, मुख्यमंत्री बनवणार, पंतप्रधान बनवणार आणि आम्हाला काय मिळणार नुसती इफ्तारची दावत आणि तोंडात खजूर? आरक्षण मात्र, नाही? “आम्ही काय भिकारी आहोत का? असा सवाल … Read more

खासदार इम्तियाज जलील कोरोनाचे भान हरपून कव्वालीत झाले मग्न; नियमालीची पायमल्ली

औरंगाबाद : शहरामध्ये शनिवार आणि रविवार लॉकडाऊन असताना देखील शान-ए-इम्तियाज या कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन दौलताबाद रोडवरील एका हॉटेलवर करण्यात आले होते. हा कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमास खा. इम्तियाज जलील यांची उपस्थिती असल्याने हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात खा. जलील … Read more

एमआयएममुळे शहराचा विकास राखडतो; ते दंगे घडवतात- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विरुद्ध खासदार इम्तियाज जलील यांची नेहमीच शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळते. आज देखील काहीसे असेच घडले आहे. चंद्रकांत खैरे एका उर्दू दैनिकाच्या वर्धापन दिन सोहळ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमवर निशाणा साधत खोचक खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली … Read more

तुम्हीच एमआयएम पक्षात या; खासदार जलील यांचे समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांना आमंत्रण

औरंगाबाद : उत्तर प्रदेश निवडणुकीवरून समाजवादी नेते अबू आझमी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात सध्या ट्विटर युद्ध सुरु आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत एमआयएम रिंगणात उतरणार असल्याने टीका करणाऱ्या अबू आझमी यांना पक्षात येण्याचा सल्ला खासदार जलील यांनी ट्विटरद्वारे दिला आहे. या ट्विटर युद्धाची सुरवात अबू आजमी यांच्या एका ट्विट द्वारे झाली. अबू आजमी यांनी एक ट्विट … Read more