लिंबूवाले अंधश्रद्धाळू सरकार एक्सा नागरी कायदा काय आणणार- असदुद्दिन ओवेसी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ‘ एक्सा सीव्हील कोड’ आणायचं म्हणत आहेत. एकीकडे फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानासमोर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लिंबू ठेवत असतील तर हे सरकार एक्सा सिव्हील कोड कसं आणणार असा सवाल एमआयएम पक्षप्रमुख खासदार असऊद्दीन ओवेसी यांनी केला आहे. शिवसेनेच्या बोटचेप्या भूमिकेवर त्यांनी सडकून टीका केली.

‘हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही’; इम्तीयाज जलीलांची सत्ताधाऱ्यांना तंबी

आजचे देशातील सत्ताधारी मुस्लिमांना दहशतवाद्यांच्या नजरेतून बघतात. सिमी काय, आयसिस काय, मुजाहिद्दीन काय, दहशतवादी म्हटलं की आम्हालाच टार्गेट करतात. पण एक भारतीय मुस्लीम म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो, हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचाही आहे असा घणाघाती पवित्रा एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांनी आज परभणीत घेतला.

एमआयएमची दुसरी यादी जाहीर, सोलापूरमधून तीन उमेदवारांची नावे

सोलापूर प्रतिनिधी। वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएम पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तसेच विधानसभेसाठी आठच जागांची ऑफर दिल्याचे सांगत एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने त्याने ११ सप्टेंबर ला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मधील काळात पुन्हा युती होणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली … Read more

नांदेडमध्ये एमआयएम उमेदवार काँग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसवर

 नांदेड प्रतिनिधी। नांदेड उत्तर मधील एमआयएम चे उमेदवार अध्यक्ष फेरोज लाला आणि नांदेड जिल्हा प्रभारी महोमद जाबेर हे काँग्रेस नेत्याच्या फार्महाऊसवर गेले होते. बिलोली येथील कॉंग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसमध्ये बंद दाराआड तब्बल एक तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. फार्म हाऊसवरील गाड्याचे आणि एमआयएम नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावरून एमआयएम काँग्रेसला … Read more