मनपाच्या वॉर्ड रचनेबाबात त्वरित सुनावणी घ्यावी; राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयास विनंती

Supreme Court

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेच्या वॉर्ड रचनेच्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲड. अजित कडेठाणकर यांनी 28 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वोर्ड रचनेच्या अधिनियमात झालेल्या सुधारणांमुळे याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांना काहीही अर्थ उरला नसून, याचिकेत पारित झालेल्या जैसे थे आदेशामुळे आयोगास नवीन नियमानुसार निवडणूक घेणे अशक्य बनल्याचे त्यांनी सर्वोच्च … Read more

गुंठेवारी योजनेला मनपाकडून पुन्हा मुदतवाढ

औरंगाबाद – अनाधिकृतपणे बांधलेल्या मालमत्ता अधिकृत करण्यासाठी महापालिकेने गुंठेवारी योजना सुरू केली. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही नागरिकांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे 31 मार्चनंतर योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मागील सहा महिन्यात फक्त 4 हजार 469 मालमत्ता नियमित करण्यात आले आहेत. त्यातून 66 कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला मिळाला. सप्टेंबर 2021 पासून महापालिकेने गुंठेवारी … Read more

आज जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

polio

औरंगाबाद – जिल्ह्यात 0 ते 5 वयोगटातील मुलांसाठी 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात तर महापालिकेच्या वतीने शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. ग्रामीण भागातील एकूण 2 लाख 67 हजार मुलांना तर शहरातील 1 लाख 98 हजार 614 बालकांना या अभियानाअंतर्गत डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषद … Read more

मनपाला गुंठेवारी नियमितीकरणातून मिळाले 66 कोटींचे उत्पन्न

औरंगाबाद – मनपाचा गुंठेवारी नियमितीकरण मोहिमेच्या माध्यमातून 66 कोटी दहा लाख 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या मोहिमेतून आतापर्यंत एकूण 4 हजार 669 मालमत्ता नियमित झाल्याचे गुंठेवारी कक्ष प्रमुख संजय चामले यांनी सांगितले. राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करून 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मनपावर टाकण्यात … Read more

सत्तारांचा आशीर्वाद मिळाला तर 2024 मध्ये माझ्यासाठी ‘अच्छे दिन’

Abdul Sattar

औरंगाबाद – शिवसेना व एमआयएम हे राजकीय पक्ष कट्टर विरोधक आहेत. पण, शुक्रवारी महापालिकेच्या नेहरू भवन पुनर्विकास कार्यक्रमात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांचे कौतुक केले तर इम्तियाज जलील यांनी ‘सत्तार यांचे आशीर्वाद मिळाले तर, 2024 मध्ये माझ्यासाठी अच्छे दिन असतील’ असे वक्तव्य केल्याने कार्यक्रमाला उपस्थित नागरिक अवाक् झाले. महापालिकेने बुढीलेन … Read more

शहरातील हाउसिंग सोसायटीमध्ये चार्जिंग स्टेशन बंधनकारक; मनपाचा निर्णय

औरंगाबाद – शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. स्मार्ट सिटीसाठी पाच इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या आहेत. महापालिका पदाधिकाऱ्यांसाठी लवकरच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली जाणार आहेत. यापुढे गृहनिर्माण संस्थांना बांधकाम परवानगी देताना चार्जिंग स्टेशनची सोय बंधनकारक केली जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असल्याने महापालिकेने शहरात 200 … Read more

मालमत्ता गहाण ठेवून मनपा काढणार 250 कोटींचे कर्ज

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेने शहरातील स्वतःच्या मालकीच्या 15 मालमत्ता गहाण ठेवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्या या मालमत्तांचे मूल्यांकन सुरु आहे. फेब्रुवारी महिन्या अखेर याबाबतची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात जाईल. त्यानंतर पालिकेला याच्या बदल्यात 250 कोटी रुपयांचे कर्ज मिळेल. हे कर्ज महापालिकेने का उचलले, असा प्रश्न पडला असेल. तर स्मार्ट सिटी योजनेत शहराचा वाटा देण्यासाठी … Read more

पालकांच्या विरोधानंतर मनपाने ‘तो’ निर्णय घेतला मागे

औरंगाबाद – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुट्टीच्या दिवशीही शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करावा असे आवाहन केले होते. औरंगाबाद महापालिकेच्या शिक्षण विभागाने दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करूनही टाकली. पण हा निर्णय पालकांना विश्वासात घेऊन घेतला नाही. आता पालकांनीच कडाडून विरोध केल्याने महापालिकेला बॅकफूटवर यावे लागले. रविवारी शाळा बंदच राहणार असे महापालिकेच्या वतीने घोषित करण्यात … Read more

…अन्यथा शहरास निर्जळी; औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा संकटात

Water supply

औरंगाबाद – तांत्रिक अडचणींमुळे शहराचा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांना तब्बल सात-आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे. त्यात आता पाटबंधारे विभागाच्या नोटिशीमुळे शहराचा पाणी पुरवठा संकटात सापडला आहे. पाणी बिलाचे 26 कोटी 32 लाख रुपये 18 फेब्रुवारीपर्यंत भरावेत, अन्यथा सोमवारपासून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. महापालिका पैठण … Read more

नवीन पाणीपुरवठा योजनेला मिळाला ‘बुस्टर’

water supply

औरंगाबाद – औरंगाबादकरांची तहान भागवण्यासाठी 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम थांबू नये यासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली आहे. यामुळे ही योजना 2023-24 पर्यंत रखडणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की, समांतर जलवाहिनीस आलेला निधी पडून होता. या निधीतून पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला … Read more