शहरातील सिद्धार्थ उद्यानाला जप्तीची नोटीस

औरंगाबाद – मार्च महिना येतोय तसे सर्वच यंत्रणांचा वसुलीचे वेध लागले आहेत. औरंगाबादेतही महसूल विभागाने थकीत वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. याच मालिकेत औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानाकडेही मोठा कर थकल्याचे समोर आले आहे. वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही महापालिका सिद्धार्थ उद्यानाचा दीड कोटी रुपयांचा थकीत करमणूक कर भरत नसल्याने अखेर अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने मनपाला उद्यान जप्तीची नोटीस … Read more

औरंगाबाद मनपा निवडणुक तुर्त अशक्य

औरंगाबाद – मुंबईसह राज्यातील 20 महापालिकांमध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, औरंगाबाद महापालिकेची निवडणूक घेता येणार नाही. जानेवारी 2020 मध्ये राज्य निवडणूक आयोगाने टाकलेल्या आरक्षणास आणि वॉर्ड रचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून या याचिकेचा निकाल लागलेला नाही. त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय नेते सुहास दाशरथे यांनी औरंगाबाद खंडपीठात महापालिका … Read more

औरंगाबादेत आजपासून आठवी, नववी व अकरावीचे वर्ग सुरू; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

औरंगाबाद – कोरोना संसर्ग वाढताच बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. मनपा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दहावी, बारावीचे वर्ग भरविण्यास परवानगी दिली होती. आता मनपा हद्दीतील शासकीयसह खासगी शाळांमधील आठवी, नववी व अकरावीचे वर्ग अटी-शर्थीच्या अधीन राहून आजपासून भरविण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने रविवारी शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी … Read more

मनपा रंगमंदिर चालवू शकत नाही तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी

औरंगाबाद – शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ रंगमंदिर नाट्यगृहासमोर आज सोमवारी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेने या नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवला असून सुरुवातीपासूनच मनसेने याला विरोध केला आहे. मात्र महापालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने पुन्हा एकदा निदर्शनं करण्यात आली. शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं … Read more

लस न घेता रस्त्यावर फिरणे महागात ! महिन्याभरात साडेसहा लाख रुपयांचा दंड मनपाने केला वसूल

औरंगाबाद – शहरात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घ्या, अन्यथा दंड वसूल केला जाईल, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. तथापि, दंड भरू पण लस न घेता फिरू, असाच आविर्भाव सध्या नागरिकांचा आहे. महापालिकेने कोरोना प्रतिबंधाची लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या एक हजार 262 नागरिकांकडून तब्बल सहा लाख 31 … Read more

शहरातील ‘या’ 15 लॅबला मनपाने बजावली नोटीस

औरंगाबाद – शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. असे असताना ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 15 लॅबला महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी काल सांगितले. कोरोना संसर्गाच्या काळात राज्य शासनाने आरोग्य यंत्रणा सतर्क केल्या आहेत. कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या झाल्या पाहिजे, यासाठी लॅबची … Read more

महापालिकेने बजावल्या शहरातील 12 रुग्णालयांना नोटिसा

aurangabad mahanagar

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या लेखा परीक्षणानंतर हा प्रकार समोर आला होता. जास्तीचे उकळलेले शुल्क परत देण्यासाठी या रुग्णालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. पण त्यानंतरही पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने महापालिकेने अशा 12 रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. … Read more

कोरोना रोखण्यासाठी मनपाचा 15 कलमी कार्यक्रम

औरंगाबाद – कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्जझाले असून, पंधरा कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. जास्तीत जास्त रुग्ण गृह विलगीकरणात राहणार आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असेल, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. कोरोना उपाययोजनांबाबत पांडेय म्हणाले, की ज्या हेल्थ केअर वर्करने लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नाही … Read more

उड्डाणपूलाच्या देखभालावरुन मनपा- एमएसआरडीसी यांच्यात टोलवाटोलवी

औरंगाबाद – शहरातील अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या जालना रोडवरील पुलांची देखभाल-दुरुस्ती करण्यावरून मनपा व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात टोलवाटोलवी सुरू झाली आहे. मुलांची देखभाल व दुरुस्ती कोणी करावी यातून दोन्ही संस्थांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे त्या मुलांची दुरुस्ती कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात आजघडीला पाच ते सहा उड्डाणपूल आहेत. यातील बांधकाम विभागाकडे शहरातील सेवन … Read more

औरंगाबाद मनसेचे नव्या नेतृत्वात पहिलेच आंदोलन; कोरोना नियमांना मात्र हरताळ

mns

औरंगाबाद – शहरातील अनेक भागातील नागरिक गुंठेवारीच्या मालमत्तांमध्ये राहतात. त्यांच्या करात मनपाने अन्यायकारकवाढ केली आहे. मुंबईत 500 चौरस फूट मालमत्ता असणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात माफी देण्यात आली, मग औरंगाबादकरांवर अन्याय का, असा सवाल करत औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आज मानपासमोर जोरदार आंदोलन केले. मागील महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये येऊन गेले. त्यावेळी पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे … Read more