अमित शहांना सहकारमंत्री करून मोदींनी साधला डाव; काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने काल मंत्रिमंडळाचा विस्तार करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काहींच्या खात्यांमध्ये बदल केले. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची (Ministry of Co-operation) जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील व्यवहारांची पारदर्शकता वाढावी तसेच सहकार क्षेत्र आणखी सक्षम व्हावे यासाठी अमित शहा यांना सहकार मंत्री … Read more

अमित शहांच्या मुलाची संपत्तीही भरमसाठ वाढलीय, त्याची चौकशी का होत नाही? नाना पटोलेंचा सवाल

amit shah nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्राकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांच्या मागे ईडीची ससेमिरा लावली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि आता तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी भाजपक8केली जात आहे. त्यावर भाष्य करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर … Read more

फडणवीस- अमित शहा यांच्यात गुप्त बैठक ; पडद्यामागे चाललय काय ??

fadanvis amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अनेक नेत्यांच्या राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यातच  दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचं कळतंय. या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

उदयनराजे भोसले यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार ?

Udyanraje Bhosale

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाला मुहूर्त लाभेल अशी माहिती गुरुवारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र्मधून उदयनराजे भोसले आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार- २ जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नाही आहे. या … Read more

पंतप्रधान – गृहमंत्री गायब, देश रामभरोसे चालला आहे ; राऊतांची सडकून टीका

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती वर बोट ठेवत शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार वर ताशेरे ओढले आहेत. देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकार वर टीकास्त्र सोडलं. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक … Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हरवले? पोलीस तक्रार दाखल

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र या संकटाच्या काळात पाच राज्याच्या निवडणुका होताच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. त्यामुळे आता गृहमंत्री अमित शाह हरवले असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस नागेश करियप्पा … Read more

मोदी-शहा का हरले ? संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोदी – शहांनी भरपूर जोर लावूनही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेस ने तब्बल 231जागा जिंकून बंगाल मध्ये एकहाती सत्ता काबीज केली. आणि भाजपला आणि विशेषतः मोदी-शहांना अस्मान दाखवले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदी – शहांच्या पराभवाची कारणे सांगितली. भाजपाने … Read more

ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बलाढ्य भाजपला अस्मान दाखवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात राज्यपाल धनकर, टीएमसी नेते आणि अभिषेक बॅनर्जी आणि पक्षाचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर उपस्थित होते.ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 231 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली. या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता … Read more

अमित शाह राजीनामा कधी देणार? नवाब मलिक यांचा सवाल

malik shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता काबीज केली. भाजपच्या या दारुण पराभवानंतर विरोधकांनी मोदी-शहांवर हल्लाबोल केला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी गृहमंत्री अमित शाह राजीनामा कधी देणार? असा सवाल केला आहे. निवडणूक कालावधीत जेव्हा बंगालमध्ये हिंसाचार झाला, तेव्हा … Read more

पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही; राऊतांनी सांगितला आपला ‘एक्झिट पोल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही अशा शब्दात त्यांनी भाजपच्या पराभवाची शक्यता वर्तवली. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत … Read more