बोगस कागदत्रे सादर करून मिळवला जामीन, वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद |  जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करून जालना जिल्ह्यातील जामिनदाराने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी लाला चव्हाण (रा. खांबेवाडी, ता. जि. जालना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी शिवाजी चव्हाण याच्याविरुद्ध गेल्या वषीर्पासून खटला सुरू आहे. या खटल्यातून जामीन मिळविण्यासाठी … Read more

ग्रा.पं. सदस्याची प्रेयसीच्या घरात आत्महत्या ; मृतदेह ताब्यात न घेतल्याने दौलताबादेत तणावपूर्ण शांतता

crime suicide

औरंगाबाद :ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सुनील प्रकाश खजिनदार यांनी गुरुवारी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.या नंतर आज नातेवाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून गावकऱ्यांनी दुकाने बंद केली आहे.यामुळे परिसराला कर्फ्यु चे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती … Read more

पुण्यातील वक्फ बोर्डाची जमीन हडपण्याचा डाव फसला; चौघा विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल

औरंगाबाद: पुण्याच्या हडपसरमधील वक्फ बोर्डाची जमीन हडपण्यासाठी ट्रस्टच्या प्रस्तावाची बनावट कागदपत्रे व स्वाक्षरी करुन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द औरंगाबादेतील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फारुख जलाऊद्दीन सय्यद, महेबुब अब्दुल गफ्फार शेख, फारुख दिलावर मनीयार आणि अन्वर शमशोद्दीन सय्यद (सर्व रा. हडपसर, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. अब्दुल कदीर साहेब … Read more

जात प्रमाणपत्रासाठी 60 हजारांची लाच मागणारा ए.सी.बी.च्या जाळ्यात

औरंगाबाद | जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 60 हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या जालना जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील शिपायाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.भाऊसाहेब भालचंद्र सरोदे (वय ५०, रा.जालना),असे लाच स्वीकारणाऱ्या शिपायाचे नाव आहे.ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. तक्रारदाराच्या नातेवाईकास जात वैधता प्रमाणपत्रासाठी भाऊसाहेब सरोदे याने 60 हजारांची मागणी केली होती. … Read more

एकाच आरोपीकडून दिवसभरात सलग दोन चेन स्नॅचिंग; घटना CCTV कॅमऱ्यात कैद

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरात पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्यांना थांबवण्यासाठी औरंगाबाद मध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाने दावा केला होता की यामुळे गुन्हेगारी कमी होईल. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच आहे. आज शहरात 2 ठिकाणी राजाबाजार आणि सिडको परिसरामध्ये पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग आणि गळ्यातील गंठण चोरीचा … Read more

म्हणून ‘तो’ बनला रिक्षा चालक, आठ ते दहा रिक्षांची केली चोरी

औरंगाबाद प्रतिनिधी । व्यवसायासाठी रिक्षा चालवायला दिली नाही म्हणून एक तरुण चक्क रिक्षा चोर बनला, त्याने आतापर्यंत शहरातील 8 ते 10 रिक्षा चोरल्या आहेत. विशेष म्हणजे तो चोरी केलेल्या रिक्षावरच प्रवासी बसवून धंदा करायचा. त्याला अशाच एका चोरी प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी वाळूज परिसरातून अटक केली आहे. संदीप काशीनाथ वाकळे असे आरोपीचे नाव आहे. … Read more

बायकोचे अनैतिक संबंध, बदनामीपोटी नवऱ्याची आत्महत्या

sucide

औरंगाबाद । पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे समाजात बदनामी झाल्याचा अपमान सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना औरंगाबादेतील मुकुंदवाडीतील संजयनगरात घडली. याप्रकरणी पत्नी रोहिणी व तिचा प्रियकर गणेश गोरे यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास नवनाथ भोळे हे मुकुंदनगर भागात पत्नी रोहिणीसोबत राहतात. काही वर्षांपूर्वी दोंघाच … Read more

औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई! मुंबईहून विक्रीसाठी आणले व जात असलेले चरस आणि एम.डी ड्रग्स जप्त

auranagabad crime

औरंगाबाद प्रतिनिधी | मुंबईहून औरंगाबादेत आणलेला एम.डी. नावाचा ड्रग्स आणि चरस एका चारचाकी वाहनातून वेदांतनगर पोलिसांनी आज पंचवटी चौकातून जप्त केले आहे.हा ड्रग्स शहरात विक्रीसाठी आणला जात असावा अशी शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी व्यक्त केली आहे. नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद , असिक अली मुसा कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व … Read more