एकाच आरोपीकडून दिवसभरात सलग दोन चेन स्नॅचिंग; घटना CCTV कॅमऱ्यात कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरात पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्यांना थांबवण्यासाठी औरंगाबाद मध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाने दावा केला होता की यामुळे गुन्हेगारी कमी होईल. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच आहे. आज शहरात 2 ठिकाणी राजाबाजार आणि सिडको परिसरामध्ये पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग आणि गळ्यातील गंठण चोरीचा प्रकार समोर आला आहे.

आज सकाळी शहरांमध्ये दोन ठिकाणी मोटर सायकल वरून चैन स्नॅचिंग चोरीचे प्रकार समोर आलेत. राजाबाजार येथील शकुंतला जयचंद सेठी ही महिला सकाळी साडेआठ वाजता जैन मंदिरात दर्शन घेण्यासाठी चालल्या होत्या. मोटरसायकल वाल्यांनी मागून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन धारदार शस्त्राने तोडून फरार झालाय. या गुन्ह्याची तक्रार सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे.

तसेच हडको परिसरातील गजानन नगर येथे सुनंदा शरद पाटील ही महिला आपले अंगण झाडत्यावेळेस सकाळी पावणे आठच्या सुमारास मोटरसायकल वरून आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक भाग त्याच्या हाती लागला आणि तो मोटरसायकलवरून लंपास झाला. या घटनेची तक्रार सिडको पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्हीचे फुटेज मधुन हे दोन्ही गुन्हे एकाच व्यक्तीने केलेले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

Leave a Comment