तूर्तास लॉकडाऊन नाही, पण…

Rajesh Tope

औरंगाबाद – राज्यात लॉकडाउन सध्या नाहीच या बाबत कुणीच अफवा पसरवू नये, भीती ही दाखवू नये तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण जेव्हा 700 मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागले की ऑटोमोडमध्ये लॉकडाउन लागेल असे टोपे म्हणाले. राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या आकडेवारीबद्दल आणि निर्बंधाबद्दल आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहीती दिली आहे. ते आज … Read more

गुंठेवारीला आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद – गुंठेवारी अधिनियमानुसार शहरातील बेकायदा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आणखी एका महिन्याची मुदत दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत मालमत्ताधारकांना फायली दाखल करता येतील. मात्र, व्यावसायिक बेकायदा मालमत्तांना ही शेवटची संधी असेल, असा इशारा पांडेय यांनी काल दिला. राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करत डिसेंबर 2020 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय … Read more

कंटेनर- कारच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा तर एकाच कुटुंबातील 4 जण ठार

accident

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अपघाताच्या घटना वाढतच आहेत. अशातच आज उस्मानाबाद येथून लातूरकडे निघालेल्या लातुरातील पाडे कुटुंबावर काळाने घात घाला घातला असून, समोरुन येणाऱ्या कंटेनरवर कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघात चार जण जागीच ठार झाले. हा अपघात उस्मानाबाद-धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भडाचीवाडीजवळ आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. हिरकणाबाई मुरलीधर पाडे (वय 70), … Read more

अज्ञात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

औरंगाबाद – जालना महामार्गावरून गोलटगावकडे जाणाऱ्या जोड रस्त्यावर हसनाबादवाडी शिवारात आज सकाळी एका तिशीतील युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या युवकाच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमेचे व्रण असल्याने हा घात की अपघात अशी स्थिती असून करमाड पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे. आज सकाळी करमाड पोलिसांना खबर मिळाली की, एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गोलटगावला जाणाऱ्या … Read more

उद्यापासून 15 ते 18 वयोगटातील बालकांना लसीकरणासाठी करता येणार नोंदणी

औरंगाबाद – नवीन वर्षात 15 ते 18 वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. 3 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु होणार असून याकरिता 1 जानेवारीपासून कोविन अ‍ॅपवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच 10 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना तसेच फ्रंटलाइन वर्कर्सना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. लसीचा दुसरा … Read more

विद्यापीठात राजकीय हस्तक्षेपामुळे शैक्षणिक नुकसान

bAMU

  औरंगाबाद – शिक्षण क्षेत्रात सध्या राजकीय हस्तक्षेप वाढत आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरण्याची भीती वाटते गुणवत्तेपेक्षा संख्यात्मक गोष्टीला अधिक महत्त्व दिले जाते त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक नुकसान होत असून या विरोधात जनमानसाने लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी केले. विद्यापीठ सुधारणा कायदा 2016 मध्ये महाविकास आघाडी सरकारने कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेमध्ये … Read more

सावधान ! औरंगाबादेत पुन्हा वाढतोय कोरोना

Corona

औरंगाबाद – एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोना संसर्ग पाय पसरवत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांचा विचार करता या आकड्यामुळे आरोग्य विभागातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत सुमारे 32 हजार तर दुसऱ्या लाटेत 40 हजार जणांना कोरोना संसर्गाची … Read more

पंधरा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार ! आईच्या सतर्कतेमुळे फुटली वाचा

rape

औरंगाबाद – शिवण क्लाससाठी जाणाऱ्या एका 15 वर्षीय विद्यार्थिनीला पंचवीसवर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे त्यावेळी मोबाइलमध्ये काढण्यात आलेली चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देत हा प्रकार दोन महिन्यांपासून सुरू होता. आईने मुलीची बॅग तपासल्याने ही घटना समोर आली असून आरोपीला अटक करण्यात आली. पंधरावर्षीय विद्यार्थिनी आई व सावत्र वडिलांसह बजाजनगर येथे … Read more

मराठवाड्यातील काही भागाला गारपिटीचा तडाखा

rain

औरंगाबाद – मराठवाड्यातील काही भागात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तसेच गारपीटही झाली. यामुळे फळबागा व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुन्हा अचानक आलेल्या या आपत्तीमुळे बळीराजाला मात्र मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गारपीट झाली. तर परभणी, नांदेड, हिंगोलीसह … Read more

विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन अकरा दिवसांनी स्थगित

bamu

औरंगाबाद – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना व सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असून, सदरील प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. असे आश्वासन दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यभरातील सर्व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काल अकराव्या दिवशी बेमुदत संप स्थगित केला आहे. कर्मचारी आजपासून नियमितपणे कामावर रुजू होणार … Read more