लेबर कॉलनीवर कारवाईस जिल्हा प्रशासन सरसावले

dangerous buildings in Aurangabad

औरंगाबाद – विश्वास नगर लेबर कॉलनी तील साडे तेरा एकर जमिनीवरील सदनिका पाडण्यासाठी काल जिल्हा प्रशासन सरसावले. 147 याचिकाकर्त्यांच्या सदनिका वगळून उर्वरित अनधिकृत आणि जे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत त्यांच्या सदनिका ताब्यात घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. आज पासून पाडापाडी सुरुवात होण्याची शक्यता आहे. 8 नोव्हेंबर 2019 रोजी जागा ताब्यात घेण्यासाठी … Read more

मनपा निवडणूक: शहरात 42 प्रभाग, 126 वॉर्ड

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका काल निकाली निघाल्या मुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर 2019 मध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे शहरात 126 वॉर्ड तयार केले, 42 प्रभागाचा आराखडा सादर केला. नवीन आराखड्यानुसार एक वार्ड नऊ ते दहा हजार लोकसंख्येच्या असेल. तीन वॉर्डाच्या एका प्रभागाची लोकसंख्या जवळपास 30 हजार असेल. राज्य … Read more

मनपा निवडणूकीचा मार्ग होणार मोकळा? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

औरंगाबाद – राज्यातील मुदत संपणाऱ्या महापालिकांमध्ये निवडणूक घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया थांबवली आहे. निवडणूक आयोगाच्या विनंतीनुसार आज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुनावणीत निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल का? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहाची मुदत … Read more

मनपाच्या वॉर्ड रचनेबाबात त्वरित सुनावणी घ्यावी; राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयास विनंती

Supreme Court

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेच्या वॉर्ड रचनेच्या याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲड. अजित कडेठाणकर यांनी 28 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वोर्ड रचनेच्या अधिनियमात झालेल्या सुधारणांमुळे याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांना काहीही अर्थ उरला नसून, याचिकेत पारित झालेल्या जैसे थे आदेशामुळे आयोगास नवीन नियमानुसार निवडणूक घेणे अशक्य बनल्याचे त्यांनी सर्वोच्च … Read more

गुंठेवारी योजनेला मनपाकडून पुन्हा मुदतवाढ

औरंगाबाद – अनाधिकृतपणे बांधलेल्या मालमत्ता अधिकृत करण्यासाठी महापालिकेने गुंठेवारी योजना सुरू केली. वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही नागरिकांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे 31 मार्चनंतर योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मागील सहा महिन्यात फक्त 4 हजार 469 मालमत्ता नियमित करण्यात आले आहेत. त्यातून 66 कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला मिळाला. सप्टेंबर 2021 पासून महापालिकेने गुंठेवारी … Read more

मनपाला गुंठेवारी नियमितीकरणातून मिळाले 66 कोटींचे उत्पन्न

औरंगाबाद – मनपाचा गुंठेवारी नियमितीकरण मोहिमेच्या माध्यमातून 66 कोटी दहा लाख 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या मोहिमेतून आतापर्यंत एकूण 4 हजार 669 मालमत्ता नियमित झाल्याचे गुंठेवारी कक्ष प्रमुख संजय चामले यांनी सांगितले. राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करून 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मनपावर टाकण्यात … Read more

मालमत्ता गहाण ठेवून मनपा काढणार 250 कोटींचे कर्ज

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिकेने शहरातील स्वतःच्या मालकीच्या 15 मालमत्ता गहाण ठेवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सध्या या मालमत्तांचे मूल्यांकन सुरु आहे. फेब्रुवारी महिन्या अखेर याबाबतची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात जाईल. त्यानंतर पालिकेला याच्या बदल्यात 250 कोटी रुपयांचे कर्ज मिळेल. हे कर्ज महापालिकेने का उचलले, असा प्रश्न पडला असेल. तर स्मार्ट सिटी योजनेत शहराचा वाटा देण्यासाठी … Read more

देशातील सर्वात उंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज होणार अनावरण

Shivaji Maharaj

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फूट उंचीच्या अश्वारुढ पुतळ्याचे आज रात्री 10:30 ते 11:30 दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असून यासह पुतळ्याची उंची 52 फूट आहे. अनावरणाच्या वेळेवरून आठवडाभरापासून राजकीय वादंग उभे राहिले असले, तरी रात्री … Read more

मनपाने शिवप्रेमींचे बॅनर हटवले; शहरात मध्यरात्री राडा

औरंगाबाद – काल रात्री शहरातले काही शिवप्रेमींचे बॅनर महापालिकेने हटवल्याने शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकात बॅनर लावण्यात आले होते. महापालिकेने रात्री उशिरा बॅनर काढल्याने घटनास्थळी अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले होते. गोंधल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांना या प्रकरणाची भणक लागताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली … Read more

मनपाच्या नागरी मित्र पथकाने केला एक लाख 32 हजारांचा दंड वसूल

औरंगाबाद – महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने शहराच्या विविध भागात दंडात्मक कारवाई करून एक लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान 15 पथकामार्फत 5 हजार 150 नागरिकांची लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यात आले. यात 85 नागरिकांनी अध्याप लस न घेतल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून प्रतिव्यक्ती पाचशे रुपये प्रमाणे एकूण 42 हजार 500 रुपयांचा … Read more