बायकोसाठी केला कारागृहात अन्नत्याग

औरंगाबाद : कारागृहात कैद असलेल्या गुन्हेगाराला गतवार्षिपासून बायको आणि मुले भेटायला येत नाही, फोनवर संपर्क करत नाही. यातच बायकोने दुसऱ्यासोबत लग्न केल्याचे त्याला कळल्यामुळे हर्सूल कारागृहातील एका कैद्याने अन्न त्यागले. त्याची तब्येत खालावत असल्याचे पाहून त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो उपचार घेत नव्हता. याची गांभीर्याने दखल घेऊन कारागृह प्रशासनाने थेट त्याच्या सासुरवाडीत … Read more

अनलॉकमध्ये 92 आठवडी बाजार लॉकच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला फटका

bazar

औरंगाबाद : कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने 13 मार्चपासून जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद केले होते. जिल्ह्यात 9 तालुक्यातुन 92 आठवडी बाजार भरतात. प्रत्येकी आठवडी बाजार भरतात. प्रत्येकी आठवडी बाजारात 2 लाख ते दहा लाख दरम्यान उलाढाल होत असते. गावाचे संपूर्ण अर्थकारण या आठवडी बाजारावर अवलंबून असते. ग्रामीण भागात कोरोना निर्बंध शिथिल होऊन ही बाजार भरवण्यास परवानगी … Read more

आश्चर्यचकीत विद्युत पुरवठा नसतानाही शेतकऱ्याला पाठवले 21 हजारांचे वीजबिल

माजलगाव : वैजापूर तालुक्यातील जातेगांव टेंभी शिवारातील राहणाऱ्या शेतकऱ्याला 21 हजार 90 रुपयाचे विजबिल पाठवल्याचा आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. क्र 19 मध्ये विहरीसाठी विद्युत पुरवठा मिळालेला नसतानाही भरमसाठ विजबिल पाठवले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांसाह ग्रामस्थही आश्यर्यचकित झाले आहेत. जातेगांव टेंभी येथील लताबाई दिगंबर मलिक यांची गट क्रमांक -19 मध्ये शेती आहे. त्यासाठी विहरीच्या विद्युत … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात बिबट्याची दहशत; हल्ल्यात 2 ग्रामस्थ गंभीर जखमी

औरंगाबाद : जिल्हयातील वैजापूर तालुक्यातील वाकला येथील ऐतिहासिक घुमट परिसरात रविवारी बिबट्या आढळला. बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात दोन गावकरी गंभीर जखमी झाले आहेत. बाळू शेजवळ, चंद्रकांत जाधव दोघेही (रा. वाकला ता. वैजापूर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल केले आहे. ही … Read more

डॉ. बा. आं. म. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याचा कुलगुरूंनी घेतला

BAMU

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षांत समारंभाचा डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी आढावा घेतला. या समारंभाची जोरदार तयारी विद्यापीठात सुरू आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदा हा सोहळाऑनलाईन पद्धतीने होणार आहे.यावर्षी 61 वा दीक्षांत समारंभ 25 जूनला ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. … Read more

केवायसी अपडेटचे आमिष दाखवून सव्वा लाखाची फसवणूक

Cyber Crime

औरंगाबाद : केवायसी अपडेटचे आमिष दाखवून सव्वा लाखाची फसवणूक केल्याची घटना 15 जूनला रात्री 8 ते 9 च्या सुमारास घडली आहे. बीएसएनएल कंपनीतील निवृत्त टेलिकॉम टेक्निकल असिस्टंटला भामट्याने तुमचे केवायसी अपडेट करायचे आहे म्हणत फसवले आहे. रमेश रामराव देशमुख (वय 67) शिवाजीनगर गारखेडा परिसर असे फसवणूक झालेल्या निवृत्त व्यक्तीचे नाव आहे. बीएसएनएल कंपनीत टेलिकॉम टेक्निकल … Read more

योग दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सायकल रॅलीत सहभाग घेत केले आवाहन

saikal

औरंगाबाद : कोरोना जागतिक महामारीच्या काळात सर्वांना चांगले आरोग्य आणि पर्यावरण संतुलनाची जाणीव झाली आहे. तेव्हा प्रत्येकाने स्वतः पासून बदलाची सुरुवात करत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी व्यायाम, योग याबरोबरच सायकल चालवणे देखील आरोग्य आणि पर्यावरण दृष्ट्या लाभदायी असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे म्हणाले. सातव्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाची जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण … Read more

सिडको भागात २९ वर्षीय महिलेची गळफास लावून आत्महत्या

औरंगाबाद : सिडको एन-4 या भागात राहणाऱ्या 29 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रोजी रात्री उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा महेश भंडारी (वय २९) रा. एन-4 सिडको असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मनीषा यांचे पती एका बँकेत नोकरीला असून त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. मनीषा यांनी शनिवार रात्री … Read more

निवडणुका नसल्यामुळे त्यावर फार चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही; अजित पवार

ajit pawar

औरंगाबाद; आज अजित पवार बीड आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर औरंगाबाद येथील विमानतळावरुन जाताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना बऱ्याच विषयांबाबत चर्चा केली. मराठा आरक्षणाची बैठक समाधान कारक झाली असून, पुढच्या आठवड्यात मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आघाडी सरकार व्यवस्थित काम करत आहे. आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत. सध्या कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे त्यावर फार … Read more

लाखोंचा माल पसार करणारा अटकेत पोलिसांची मध्य प्रदेशात जाऊन कारवाई

औरंगाबाद : मध्यप्रदेशातील कंपनीत पाठवलेला २३ लाख २८ हजार ३४७ रुपये किंमतीचा माल परस्पर लांबवून एका कंपनीला विक्री केल्या प्रकरणी पोलिसांनी एका व्यापाऱ्याला बुधवारी रात्री अटक केली आहे. हा माल चिकलठाणा येथून पाठवण्यात आला होता. अक्षय कमल मित्तल (रा. मौलाना आझाद मार्ग, सेधवा जि. बडवानी मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश … Read more