मोठी बातमी! औरंगाबाद जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिलदरम्यान संपूर्ण लाॅकडाउन;जिल्हाधिकारी यांचा आदेश

औरंगाबाद | शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पाॅझिटीव्ह रूणांसोबत मृत्यूचे प्रमाणही वाढले असून, दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने जोरदार पावले उचलली असून शहरात 30 मार्च ते 8 एप्रिल कडक लाॅकडाऊनचे आदेश काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले आहे. या दिवसात सर्व व्यवहार संपूर्णपणे बंद … Read more

दुचाकी चोराकडून सव्वातीन लाखांच्या १२ दुचाकी जप्त

वाळूज महानगर : जोगेश्वरी येथील अट्टल दुचाकी चोर धनंजय उर्फ धन्या पिंपळे (३०) यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी धनंजय उर्फ धन्या याच्या ताब्यातून सव्वातीन लाखांच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरणारा अट्टल दुचाकीचोर धनंजय उर्फ धन्या पिटोरे-पिंपळे हा बुधवार २४ रोजी रांजणगाव परिसरात येणार असल्याची माहिती गुप्त … Read more

खबरदार!! रेल्वेतून पेट्रोल, केरोसिन, सिलिंडर घेऊन जाल तर…

औरंगाबाद : सध्या रेल्वे पोलिसांकडून प्रवेशांसाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे. रेल्वेमध्ये बरेच लोक सिगारेट ओढतात. अनेकजण सिलिंडर, केरोसीन, पेट्रोल घेऊन जातात. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रेल्वेतून पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सिलिंडर घेऊन जाऊ नका, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. उन्हाळ्यात आगीच्या घटना देखील सर्वाधिक होतात. त्यामुळे आरपीएफ … Read more

औरंगाबाद जिल्ह्यातील पेट्रोलपंपांच्या वेळेत बदल

औरंगाबाद : कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील पेट्रोलपंपांच्या वेळांत काही बदल केले आहेत. आज दि. 27 व 28 मार्च म्हणजे शनिवार व रविवार रोजी फक्त अत्यावश्यक सेवा, आरोग्य ॲम्बुलन्स सेवा, पोलीस प्रशासन, शेती माल वाहतूक सेवा यांनाच पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. सोमवार 29 मार्चपासून ते 4 एप्रिल पर्यंत रात्री 8 वाजेपासून … Read more

एमपीएससी परीक्षा; दोन कोरोनाबाधितांनी दिली परीक्षा, १९८३ परीक्षार्थींची परीक्षेकडे पाठ

औरंगाबाद | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आज २७ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात आली. यावेळी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियम पाळून एमपीएससी परीक्षा घेण्यात आली. एमपीएससी परीक्षेला एकूण ४ हजार २७० परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर तब्बल १ हजार ९८३ परीक्षार्थींनी पाठ फिरवली. … Read more

जि.प. सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला मंजुरी

औरंगाबाद | जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थ समितीचे सभापती किशोर गलांडे यांनी हा अर्थसंकल्प आज सादर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्वसाधारण सभा ऑनलाइन पध्दतीने अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाचे 2020 आणि 2021 चे सुधारित आणि 2021, 2022 च्या मूळ अर्थसंकल्पीय … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मार्गदर्शक सूचना जारी, साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. या … Read more

बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या महिलेसह 4 जणांच्या टोळीचा पर्दाफाश, एकाच महिलेचे अनेकांशी विवाह लावून अनेकांना गंडा

औरंगाबाद | बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या टोळीचा देवगाव रंगारी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, मुख्य सूत्रधार महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, पैसे घेऊन लग्न लावणा-या व फसवणूक करणा-या सक्रीय टोळीची माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना  खब-याकडून मिळाली. त्यानुसार अहिरे यांनी बनावट नवरदेव तयार करून … Read more

औरंगाबाद शहरात संचारबंदीची कठोर अंमलबजावणी

aurangabad police

औरंगाबाद : शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. रात्री ८ ते पहाटे ५ या कालावधीत संचारबंदी आणि शनिवार, रविवार लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे कोरोनाची साखळी तुटेल अशी अपेक्षा आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर हे शक्य आहे. असे असूनही नागरिक रात्री ८ वाजेनंतर संचारबंदीचे उल्लंघन … Read more

औरंगाबाद शहरात ३७ केंद्रांवर महापालिकेकडून लसीकरण अभियान

औरंगाबाद | राज्य सरकारच्या निर्देशानुसार ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना एक एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाची तयारी महापालिकेने केली असून शहरात ३७ केंद्रे यासाठी तयार केले जाणार आहेत. लस घेण्यासाठी येताना नागरिकांना मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड या पैकी एक पुरावा सादर करावा लागणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी … Read more