Sunday, May 28, 2023

एमपीएससी परीक्षा; दोन कोरोनाबाधितांनी दिली परीक्षा, १९८३ परीक्षार्थींची परीक्षेकडे पाठ

औरंगाबाद | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आज २७ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात आली. यावेळी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियम पाळून एमपीएससी परीक्षा घेण्यात आली. एमपीएससी परीक्षेला एकूण ४ हजार २७० परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर तब्बल १ हजार ९८३ परीक्षार्थींनी पाठ फिरवली. तसेच दोन कोरोनाबाधितांनी देखील दोन केंद्रावर पीपीई किट घालून परीक्षा दिली.

शहरात आज घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेला सकाळी ९ वाजेपासून विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. यावेळी विद्यार्थ्यांना मास्क लावूनच केंद्रावर प्रवेश देण्यात आला. सदरील परीक्षा ही शहरातील १७ केंद्रावर घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण ७२९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

यावेळी कोरोना बाधित परीक्षार्थींना देखील परीक्षेसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे दोन कोरोनाबाधित परीक्षार्थींनी पीपीई किट घालून परीक्षा दिली. यावेळी त्यांना स्वतंत्र व्यवस्था परीक्षा विभागाच्या सूचनांनुसार करण्यात आली. याशिवाय एमपीएससी परीक्षार्थींना मास्क बरोबर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असल्याचे एमपीएससी परीक्षा विभागाने सांगितले.

पोलीस बंदोबस्तात परीक्षा
शहरातील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, एसएफएस स्कुल, मुकुल मंदिर शाळा, वेणूताई चव्हाण शाळा आदी एकूण १७ केंद्रावर एमपीएससीची परीक्षा घेण्यात आली. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

विद्यार्थ्यांना थर्मल गनद्वारे तपासणी करूनच परीक्षा केंद्रावर सोडण्यात आले. यावेळी मास्क लावून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बसविण्यात आले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group