कोविड सेंटरमध्ये खाटाच शिल्लक नाही; घरीच उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

औरंगाबाद | शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेचे कोविड केअर सेंटर फुल्ल झाले आहेत. या सेंटरमध्ये खाटा शिल्लक नाहीत. त्यामुळे उपचारासाठी कोविड केअर सेंटरकडे येणाºया बाधितांना औषध देऊन घरी पाठवण्यात येत असल्याचे काही बाधितांच्या नातेवाइकांच्या सांगण्यावरून स्पष्ट झाले आहे. शहरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वाढू लागली आहे. पाच-सहा दिवसांपासून तर रोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण … Read more

बोगस कागदत्रे सादर करून मिळवला जामीन, वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद |  जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करून जालना जिल्ह्यातील जामिनदाराने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी लाला चव्हाण (रा. खांबेवाडी, ता. जि. जालना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी शिवाजी चव्हाण याच्याविरुद्ध गेल्या वषीर्पासून खटला सुरू आहे. या खटल्यातून जामीन मिळविण्यासाठी … Read more

विभागीय क्रीडा संकूल, देवगिरीत जम्बो कोवीड सेंटर; महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासण्या

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील १५ दिवसांमध्ये सुरू केलेले सर्व कोवीड सेंटर हाउसफुल्ल झाले आहेत. शहरात ९ हजारांपेक्षा अधिक सक्रि य रूग्ण आहेत. नवीन रूग्णांसाठी विभागीय क्रीडा संकुल आणि देवगिरी बॉईज होस्टेलमध्ये कोवीड सेंटर उभारण्याची प्रक्रि या मनपाने सुरू केली आहे. महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासणी … Read more

… आता रूग्णालयातील बेडची उपलब्धता लगेच कळणार

औरंगाबाद | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध ठेवण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांना सूचना केल्या आहेत. तर रूग्णालयात बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी दोन अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मोबाईलवर संपर्क साधून अवघ्या काही मिनिटांतच बेड उपलब्ध आहेत की नाही, याची माहिती मिळणार आहे. शहरी भागात … Read more

सलीम अली सरोवरातील मरण; पावलेल्या माशांची चौकशी सुरू

औरंगाबाद | ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील हजारो मासे रविवारी मृत्यूमुखी पडले. सोमवारी महापालिका अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरोवराची पाहणी केली. मृत माशांचे नमुने विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाला पाठवले आहेत, तर पाण्याच्या नमुन्यांची तपासणी प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत आहे. सोमवारी सकाळीच महापालिकेचे मुख्य पशूसंवर्धन अधिकारी बी.एस. नाईकवाडे, उपअभियंता अशोक पद्मे, चांडक यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या … Read more

कोविड केअर सेंटरच्या सुविधा तातडीने वाढवा ; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सूचना

sunil chavaan

औरंगाबाद : ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसांत वाढत असलेला कोरोना संसर्ग वेळीच रोखण्यासाठी त्या ठिकाणी कोरोना चाचण्या आणि वाढीव रूग्णसंख्येच्या प्रमाणात कोविड केअर सेंटरच्या सुविधा तातडीने वाढविण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने यंत्रणांना निर्देशित केले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी … Read more

गुरुवारपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज

rains

औरंगाबाद : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेमोसमी पाऊस होत आहे. काही भागांत गारपीट व विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे. त्यामुळे साधारण गुरुवारपर्यंत राज्यात ठिकठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कर्नाटकाची किनारपट्टी ते मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र … Read more

रेल्वेतून येणाऱ्या इतर प्रवाशांचे काय? केवळ दिल्लीहुन येणाऱ्या प्रवाशांचीच होतेय कोरोना चाचणी

cheking

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा हा ६७ हजार पार जाऊन पोहोचला असताना दुसरीकडे प्रादुर्भाव कमी होण्यासाठी विशेष यंत्रणा उभी केली जात आहे. त्यासाठी कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात चाचणी केली जात आहे. रेल्वे स्थानकावर रेल्वेतून विविध ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांचे काय? असा देखील प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. केवळ दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात … Read more

गड आला पण सिंह गेला ; बागडेंच्या पराभवानंतर सत्तारांची प्रतिक्रिया

sattar and bagade

औरंगाबाद : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व असलेले माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत सपाटून पराभव झाला. यानंतर गड आला पण, सिंह गेला अशा शब्दांत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीतील पॅनलमध्ये शेतकरी विकास पॅनल हा शिवसेना सहीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस असा होता. ज्यांचे नाव … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात आणखी अकरा रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी

ghati

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. घाटी रुग्णालयात आणखी ११ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली असून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. घाटी रुग्णालयात आज दुपारी आलेल्या अहवालानुसार आणखी ११ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात अंगुरीबाग येथील ९३ वर्षीय पुरुष रुग्णाचा … Read more