औरंगाबाद शहरातील प्रत्येक वॉर्डात हनुमान चालीसा पठण करणार; मनसेचा निर्धार 

औरंगाबाद – राज्यात सध्या भोंगे आणि हनुमान चालीसाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान आज हनुमान जयंती आहे. औरंगाबाद शहरातील प्रत्येक वॉर्डात हनुमान चालीसा पठण करणार, तसेच जर हिंदुस्थानात हनुमान चालीसा म्हणायचं नाही तर कुठे म्हणायचं असा सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांची उपस्थित केला आहे. सध्या राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसा यावरुन चांगलेच राजकारण तापले … Read more

761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची कोरोनापासून सुटका 

Corona

  औरंगाबाद – कोरोना महामारी पासून तब्बल 761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची सुटका झाली आहे. काल जिल्ह्यात तीन कोरूना रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण शिल्लक राहिला नाही. नव्याने आढळून येणारे रुग्णही गेल्या सहा दिवसांपासून शुन्यच आहेत. 15 मार्च 2020 रोजी शहरात धोरणाने शिरकाव केला. त्यानंतर शहरात कोरोनाचा उद्रेक … Read more

जालना-औरंगाबादहून नवीन वर्षात धावणार इलेक्ट्रिक इंजिन

railway

औरंगाबाद – मनमाड (अंकाई) ते रोटेगाव रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान 5 महिन्यांत म्हणजे सप्टेंबरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल. तर औरंगाबाद ते जालना दरम्यान फेब्रुवारी 2023 पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्रीय रेल्वे विद्युतीकरण … Read more

उन्हामुळे सकाळच्या सत्रात भरणार शाळा 

औरंगाबाद – उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी घेतला आहे. एका सत्रात भरणाऱ्या शाळा सकाळी 7: 30 ते 11:30 पर्यंत, तर दोन्ही सत्रात भरणाऱ्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार नियोजित अध्यापनाच्या तासिका आज बदल होणार नाही. तसेच … Read more

अखेर ‘त्या’ किर्तनकार बाबावर गुन्हा दाखल

औरंगाबाद – समव्यावसायिक क्षेत्रातील महिलेसोबतची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर वैजापूरच्या त्या महाराजासह महिलेवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. बाळकृष्ण मोगल (वय 48, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे. साधारण चार दिवसांपूर्वी बाळकृष्ण माेगल याच्यासोबत समव्यावसायिक 40 वर्षीय महिलेची अश्लील चित्रफीत गंगापूर, वैजापूर तालुक्यात व्हायरल झाली … Read more

…तर मशिदींवरील भोगे कार्यकर्त्यांनी काढावे; करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा इशारा

औरंगाबाद – मशिदींवरील भोंगे रात्री दहानंतर वाजले तर ते करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी काढावेत, असा इशारा करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपालसिंह अम्मू यांनी दिला. उच्च न्यायालय ही संवैधानिक संस्था असून निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देश चालतो, उच्च न्यायालयही त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात … Read more

डॉक्टरशी वाद घालताना रोखल्याने मोडला पाय

marhan

औरंगाबाद – डॉक्टरशी वाद घालत असल्यामुळे मित्राला रोखताच त्याने सहा साथीदारांच्या मदतीने बेसबॉलच्या बॅटने मित्राचेच पाय मोडल्याचा धक्कादायक प्रकार हडको, एन-13 भागातील मैदानात घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. न्यायालयाने आरोपींची 12 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. जटवाडा रोडवरील एका डॉक्टरसोबत … Read more

तापमान पोहोचले 41 अंशांवर; शाळेत मुलांची लाहीलाही

summer

औरंगाबाद – राज्यातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेसंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हापातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या. याबाबत औरंगाबाद जिल्हा प्रशासन विभाग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. यंदा कोरोनामुळे विलंबाने शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक … Read more

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पतीला सोडून नववधू गेली पळून; पोलिसांनी ‘असा’ केला रॅकेटचा पर्दाफाश

Multi Marriage

  औरंगाबाद – नववधूला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे. शुभांगी शिंदे असे अटक केलेल्या नवरी मुलीचे नाव आहे. काल दुसऱ्याचं एका मुलांसोबत लग्न लावताना त्या मुलीला अंमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील राजेश प्रकाश लाटे याचा जळगाव येथील शुभांगी प्रभाकर शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. बबन म्हस्के जळगाव व आशाबाई … Read more

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून 14 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार

Rape

औरंगाबाद – मामाकडे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे मूळ गावातील मुलाशी प्रेमसंबंध जुळले, प्रेमाच्या आणाभाका घेऊन झाल्या. अल्पवधीतच दोघांनी 5 एप्रिल रोजी पलायनही केले, त्यानंतर मुलगी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील गावी परतली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याने संबंधित विधीसंघर्ष बालकाविरोधात पोक्सो कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा पुंडलिकनगर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे, ही माहिती पोलिस निरीक्षक दिलीप गांगर्डे … Read more