थरारक! रिव्हॉल्व्हर लावून व्यापाऱ्याचे सात लाख लुटले

Crime Gun

जालना – शहरातील प्रसिद्ध किराणा तसेच सिमेंटचे व्यापारी अमित अशोक अग्रवाल हे त्यांची दुकान बंद करून घरी जात असताना त्यांना संतोषी माता मंदिर मार्गावर लुटले. त्यांच्या पायावर प्रथम लोखंडी रॉड ने मारून त्यांना जखमी केले. आणि नंतर रिव्हॉल्व्हर लावून त्यांच्याकडील सात लाख रुपये असलेली बॅग आणि दुचाकी घेऊन दोन चोरटे पसार झाले. ही घटना काल … Read more

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरण; आज दिल्लीत महत्वाची बैठक

aurangabad Airport

औरंगाबाद – चिकलठाणा विमानतळाचे विस्तारीकरण, रुंदीकरण, इमिग्रेशन चेक पोस्ट, विमान कंपन्यांच्या फेरा वाढविण्यासंदर्भात आज दुपारी दीड वाजता केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत राजीव गांधी भवन नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाचे प्रश्न प्रलंबित असून, प्रामुख्याने धावपट्टीच्या विस्तारीकरण आणि रुंदीकरण उडान योजने अंतर्गत … Read more

परीक्षेला आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

औरंगाबाद – संबंध ठेवल्यास आपल्या लग्नात तुझी आई विरोध करणार नाही, असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 16 वर्षाच्या तरुणीसोबत संतोष यशवंत सरनागट (20, रा. मुकुंदवाडी) यांने मैत्री केली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यास मुलीच्या आईचा विरोध होता. त्यामुळे मुलीचे कुटुंब मुकुंदवाडी सोडून दुसरीकडे राहण्यास … Read more

सुर्य ओकतोय आग! औरंगाबादचा पारा @43.2 

summer

औरंगाबाद – शहरात मे महिन्यात आता सूर्य आग ओकत असून, काल चिकलठाणा वेधशाळेत 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यासह गेल्या दोन वर्षातील उच्चांकी तापमान ठरले आहे. मे महिन्यातील हे गेल्या पाच वर्षातील उच्चांकी तापमान असून, रणरणत्या उन्हामुळे आणि उकाड्याने जिवाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे. सूर्याचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून शहरात … Read more

प्रेमात अडसर ठरणाऱ्या महिलेचा अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंडच्या मदतीने केला खून

औरंगाबाद – प्रेमात अडथळा ठरणाऱ्या महिलेचा एका अल्पवयीन मुलीने बॉयफ्रेंड अल्पवयीन मैत्रिण आणि मित्राच्या मदतीने बाळापुर शिवारातील शेतात बोलून घेऊन गळा चिरून खून केल्याची घटना काल उघडकीस आली. ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत या खुनाचा उलगडा करत मारेकरी बॉयफ्रेंड व त्याच्या मित्रास अटक केली. तर दोन विधिसंघर्षग्रस्त मुलींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या घटनेमुळे मुकुंदवाडी … Read more

क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी; महिला-पुरुष एकमेकांना भिडले

औरंगाबाद – शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरात दोन गटामध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत गुडघ्यातून रक्तस्त्राव होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. या हाणामारीत लाकडी दांड्यांनी देखील मारहाणा करण्यात माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादच्या बजाज नगर परिसरात संबंधित घटना घडली आहे. दोन गटातील महिला आणि पुरुष … Read more

नशा करताना झालेल्या वादातून तरुणाचा चाकूने भोसकून खून 

औरंगाबाद – रेकॉर्डवरील गुन्हेगाराला चाकूने भोसकून मारणारा आरोपी थेट जिन्सी पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना मध्यरात्री घडली. यात जखमीचा रस्त्यावर जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिन्सीचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट केंद्रे यांनी दिली. शेख शाहरुख शेख अन्वर (17 वर्ष 6 महिने, रा. इंदिरानगर, बायजीपुरा, ग.नं. 30) असे मृताचे नाव आहे. हैदर खान उर्फ शारेख जाफर खान … Read more

माहेराहून पाच लाख आण म्हणत विवाहितेचा छळ; पतीसह पोलिस सासऱ्याविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद – पत्नीला माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सहायक फौजदार सास-यासह पाच जणांविरुध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 जुलै ते 26 नोव्हेंबर 2021 या काळात घडल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपअधीक्षकांच्या वाहनाचा चालक अशोक रामचंद्र महाले यांचा … Read more

नियमित पाणीपुरवठ्यासाठी मनपाचा आजपासून नवीन प्रयोग

औरंगाबाद – उन्हाळ्यामुळे शहरातील पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जायकवाडी जलायशयातून येणारे पाणी अपुरे पडत असल्याने आता हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणी उपसा करण्यात येणार आहे. त्यासाठी या तलावापासून जटवाडा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र वाहिनी टाकण्यात येत आहे. आजपासून महापालिकेने ही मोहीम हाती घेतली असून यानंतर तरी शहराची पाण्याची तहान भागतेय का? शहराला चार दिवसांनी पाणीपुरवठा होऊ … Read more

बुधवारपासून लेबर कॉलनीवर हातोडा; अनेकांनी सोडली घरे

औरंगाबाद – उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळपासूनच धडक कारवाईला सुरूवात करणार आहे. यामुळे कारवाई अटळ असल्याची खात्री पटल्याने आता लेबर कॉलनी येथील अनेक नागरिकांनी घरे रिकामी करणे सुरु केले आहे. रविवारी सायंकाळपर्यंत अनेकांनी घरे रिकामी केली. मात्र, घरांचा ताबा पुनर्वसनाची लेखी हमीनंतर देण्यात येईल, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून … Read more