मनपा निवडणुकीबाबत ‘या’ तारखेला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

औरंगाबाद – महानगरपालिका निवडणुकीबाबत आता 15 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार प्रभाग रचना करायची असल्यामुळे न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेचा उद्देश संपला आहे, असे शपथपत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने 11 नोव्हेंबरला एक शपथपत्र दाखल केले त्यात आयोगाने म्हटले आहे की, शासनाने पालिकेची निवडणूक … Read more

व्वा रे महसूल विभाग ! भूमिहीन शेतकऱ्याला आले अतिवृष्टीचे अनुदान 

SIP

औरंगाबाद – एकीकडे ज्यांना शेती आहे ज्यांचे अतिवृष्टी मुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. तोच दुसरीकडे मात्र, एका भूमीहीन व्यक्तीस अतिवृष्टीची 825 रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचा प्रकार अजिंठा येथे उघडकीस आला. त्या भूमिहीन व्यक्तीने मिळालेली रक्कम शासन खात्यावर जमा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी … Read more

निलंबनाची टांगती तलवार; वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

suicide

औरंगाबाद – राज्य शासनाने संपावरील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. यामुळे प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. कर्मचार्‍यांवर सेवा समाप्ती निलंबन अशा प्रकारची कारवाई सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी या कारवाईची जास्ती घेतली असून अशा परिस्थितीत गंगापूर आगारातील एका वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कैलास विश्वनाथ तुपे (49, … Read more

चार पानी सुसाईड नोट लिहून तलाठ्याने केली आत्महत्या

Suicide

औरंगाबाद – तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात कार्यरत एका तलाठ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. लक्ष्मण नामदेव बोराटे (४०, रा. कोळेकर गल्ली, सातारा परिसर) असे गळफास घेतलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या घटनेने सध्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबाद … Read more

जालन्याला निघालेल्या दोन एसटी बसवर दगडफेक

औरंगाबाद – एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख भूमिकेवर एसटी कर्मचारी ठामच आहे. दरम्यान सिडको बसस्थानकात शनिवारी चार लालपरी औरंगाबाद-जालन्याकडे रवाना करण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये दोन्ही बसच्या पाठीमागील काच फुटल्याने एसटीचे अंदाजे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचा परिणाम रविवारी दिसून आला. त्यामुळे रविवारी … Read more

वैद्यनाथ मंदिरानंतर आता ‘या’ मंदिराला आरडीएक्सने उडवण्याच्या धमकीने खळबळ

parli

बीड – परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या योगेश्वरी मंदिराला आरडीएक्सने उडवण्याची धमकीचे पत्र मिळाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया आहे. मला खाजगी व महत्वाच्या कामासाठी 50 लाख रुपयांची गरज आहे. हे … Read more

प्रियकरानेच प्रेयसीला घातला 22 लाखांचा गंडा

Fraud

औरंगाबाद – गेल्या काही वर्षांपासून प्रियकरासोबत राहणाऱ्या एका महिलेला शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देतो, असे सांगत तब्बल 22 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. पैसे घेतल्यानंतर प्रियकर गायब असून प्रेयसीने आता उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. पोलीस या प्रकरणी ज्ञानेश माणिकराव कांदे (परळी,बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या … Read more

ट्रॅक्टरला दुचाकी धडकून दोन जण गंभीर जखमी; पैठण जवळील घटना

Accident

औरंगाबाद – दिवसभराचे आपले काम आटोपून भरधाव वेगात पाचोडहुन दुचाकीने आंतरवाली (खांडी) (ता.पैठण) या गावी परतणाऱ्या तरुणाची दुचाकीसमोर जाणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना धूळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळेजवळ (ता.पैठण) शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यासंबंधी अधिक माहिती अशी, आंतरवाली खांडी (ता.पैठण) येथील काशीनाथ रामेश्वर हांडे (30) व अंकुश मुरलीधर दिसागज … Read more

लसीकरणात जिल्ह्याची भरारी; काल एका दिवसात विक्रमी लसीकरण

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आगळ्यावेगळे आदेश काढून लसीकरण वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे लसीकरण मोहिमेला जिल्ह्यातील गावागावातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून काल दिवसभरात 47 हजार 799 नागरिकांनी लस घेतली. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी राज्यात 31 व्या क्रमांकावर असलेला जिल्हा थेट 18 व्या स्थानी पोहोचल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे … Read more

सिडको बसस्थानकातून वीस दिवसांनंतर लालपरी रस्त्यावर; ‘या’ मार्गावर धावली बस

औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यावर शासनाने त्यांची पगारवाढ करून संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यानंतरही काही कर्मचारी संपावर ठाम असल्याने अजूनही लाल परीची चाके आगार आतच रुतली आहेत. परंतु संपातील काही कर्मचारी कामावर परतल्यामुळे काल सिडको बसस्थानकातून तब्बल 20 दिवसांनंतर जाण्यासाठी चार बसेस रवाना करण्यात आल्या. … Read more