किरीट सोमय्यांच्या रडारवर अर्जुन खोतकर ! 100 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप

somayya

औरंगाबाद – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांच्या रडारवर आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर असल्याचं आता स्पष्ट झाल आहे. सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी 100 कोटीचा … Read more

प्रा. राजन शिंदे खून प्रकरणाचा प्रगती अहवाल बाल न्याय मंडळासमोर सादर

Crime D

औरंगाबाद – संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या डॉ. राजन शिंदे खून प्रकरणातील तपासात मोठी घडमोड समाेर आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी हा गुन्हा निर्घृण ठरविण्यासाठी आवश्यक असलेला प्रगती अहवाल बाल न्याय मंडळासमोर (जेजेबी) 28 दिवसांतच सादर केला आहे. मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. राजन शिंदे यांचा राहत्या घरी 11 ऑक्टोबरला मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप: औरंगाबाद शहरातील स्मार्ट शहर बससेवा ठप्प

smart city bus

औरंगाबाद – एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांच्या संपाचा फटका औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेला ही बसला असून मागील बारा दिवसांपासून शहर बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी ला दररोज पावणेतीन लाख रुपयांवर पाणी सोडावे लागत असून, प्रशासनाने बस सेवा सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि अस्मार्ट प्रशासनामुळे शहरातील … Read more

व्यापारी महासंघाच्या अध्यध, महासचिवपदासाठी 22 अर्ज दाखल

aurangabad

औरंगाबाद – कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा व्यापारी महासंघाची निवडणूक प्रक्रीया सुरु झाली आहे. येत्या २१ नोव्हेंबरला अध्यक्षांसह नवीन कार्यकारणीची निवड केली जाणार आहे. दरम्यान, बुधवारी अध्यक्ष, महासचिवासह 9 पदासाठी 22 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. पहिल्यांदाच होणारी निवडणूकी चांगली रंगतदार होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 19 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली महासंघाची आतापर्यंत … Read more

जन्मदात्या पित्याने केले मुलीच्या हातावर चाकुने वार

Crime

औरंगाबाद – शहर व परिसरात मागील अनेक दिवसांपासून शुल्लक कारणांवरून चाकू किंवा तलवारीने वार करणे, खून करणे अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आता बाथरूम मध्ये पाणी सांगण्याच्या कारणावरून दारुड्या पित्याने मुलीला शिवीगाळ करून चाकूने हातावर वार केल्याची घटना शहरातील मिटमिटा भागातील तारांगण कासलीवाल येथे घडली आहे. विक्रांत हरिश्‍चंद्र निर्मळ असे दारुड्या पित्याचे … Read more

भेसळयुक्त अन्न पदार्थ विकणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई – राजेंद्र शिंगणे

Rajendra Shingane

औैरंगाबाद – हॉटेल असो वा रस्त्यावर भेळ, पाणीपुरी विक्रेता त्यांनी ताजे, स्वच्छ, सकस पदार्थच विकले पाहिजे, एवढेच नव्हे तर वैयक्तिक स्वच्छतेवरही भर दिला पाहिजे, यासाठी विक्रेत्यांनी नखे कापणे, डोक्यावरील केस अति वाढू न देता कटिंग केली पाहिजे, सोबत दर महिना किंवा दिड महिन्याला त्यांना स्वत:ची वैद्यकीय तपासणी करावी, असे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री … Read more

प्रभागरचनेच्या कच्च्या आराखड्यासाठी मागितला दहा दिवसांचा वेळ

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो 18 नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने कच्चा आराखडा तयार केला आहे; पण महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय सध्या दौऱ्यावर असल्याने कच्चा आराखडा पाठविण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मिळावा, असे पत्र महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिकेची निवडणूक … Read more

शहरातील ‘या’ केंद्रांवर मिळणार 16 तास लस

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रशासनाने सक्तीचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर लोकांच्या रांगा लागत आहेत. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेऊन आता शहरातील दहा ठिकाणी सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या वेळेनुसार लस घ्यावी अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी … Read more

‘त्या’ प्रकरणात दोन विधिसंघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या ताब्यात

Crime

औरंगाबाद – पेट्रोल पंपावरील कर्मचारी खराब झालेल्या विद्युत मोटारीच्या पाहणीसाठी गेल्यावर संधी साधत दोन विधीसंघर्ष बालकांनी काउंटर मधील 1 लाख 33 हजार 580 रूपये चोरल्याची घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास आझाद चौकातील एस्सार पेट्रोल पंपावर घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून सीसीटीव्हीच्या मदतीने दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेल्या रकमेपैकी 43 … Read more

धर्मगुरूंनी लसीकरण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

sunil chavhan

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधात्मक लस सर्व नागरिकांनी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व धर्म गुरूंनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील धर्मगुरूंची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस इंजि. वाजेद कादरी, युसूफ अन्सारी, … Read more