मंदिरे खूलीकेल्याबद्दल भाजपचा आनंदोत्सव

BJP Flag

औरंगाबाद – राज्य सरकारने राज्यातील धार्मिकस्थळे गुरुवारपासून (ता.सात) खुली केली. ही मंदिरे उघडण्यात यावेत यासाठी भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनास यश मिळाल्याचे सांगत भाजपतर्फे गजानन महाराज मंदिरात आरती करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरती करण्यात आली. … Read more

हृदयदावक ! आजीच्या डोळ्यासमोर तीन नातवंडे गेली वाहून; दोघांचे मृतदेह सापडले तर एक बेपत्ता

water

औरंगाबाद – जिल्ह्यातील वाणेगाव येथील गिरजा नदीच्या पात्रात तीन लहान मुलं बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी दोन मुलांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. तर एका मुलाचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. बचाव पथकाच्या हाती आलेले दोन्ही मृतदेह हे दोन सख्या भावांचे आहेत. तर त्यांच्या मित्राचा शोध सुरु … Read more

खड्ड्यांमुळे महिलेची बसमध्येच प्रसूती, बाळाचा मृत्यू

baby

औरंगाबाद – गेल्या महिन्यापासून सतत होणारा पाऊस आणि जागोजागी साचलेले पाणी, रस्त्यावरील खड्डे यामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था तर खूपच गंभीर झाली आहे. याचाच एक दाखला म्हणजे सोमवारी रात्री घडलेली दुर्दैवी घटना. रात्रीची वेळ आणि प्रसूती वेदना सुरु झाल्याने शिऊर बंगला येथून एक महिला तिच्या पतीसह उपचारासाठी औरंगाबादच्या … Read more

विद्यापीठातील ‘त्या’ गाईडवर समितीच्या चौकशीनंतर कारवाई

bAMU

औरंगाबाद – मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचा आरोप असलेले पीएचडी गाईड डॉ. गीता पाटील यांच्यावर तक्रार निवारण समितीच्या चौकशीनंतर कारवाई संदर्भात हालचाली करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले त्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बोलविण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठातील मानव व सामाजिक … Read more

नाशिक- औरंगाबाद महामार्गावर एसटी दुचाकीचा अपघात, तीन ठार

accident

औरंगाबाद – वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील नाशिक औरंगाबाद महामार्गावर अजित पेट्रोलपंपाजवळ एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.पाच) सायंकाळी घडली. औरंगाबाद – नाशिक बस (एम एच 14 बीटी 3344) ही खंडाळाकडुन वैजापूरकडे जात होती. तर दुचाकीवरुन (एमएच 20 एफएन 4172) तीन जण वैजापूरकडुन शिऊरकडे जात … Read more

मनपा मालामाल ! करवसुलीतून 61 कोटींची तिजोरीत भर

औरंगाबाद – मनपाच्या तिजोरीमध्ये चालू आर्थिक वर्षात कर वसुलीतून एकूण 61 कोटी रुपयांची भर पडली आहे. यामध्ये मालमत्ता कराचे 47 कोटी 87 लाख तर पाणीपट्टीची 13 कोटी 14 लाख रुपये वसूल केले आहेत. सध्या प्रशासनाकडून कर वसुलीवर विशेष लक्ष देण्यात आले असून, वॉर्डनिहाय कर्मचारी घरोघरी जाऊन कर वसुली करत असल्याची माहिती उपायुक्त अपरणा थेटे यांनी … Read more

नगरहून येणाऱ्या नागरिकांची होणार कोरोना चाचणी, जिल्ह्याच्या सीमेवर उभारणार तपासणी केंद्र – जिल्हाधिकारी

Corona Test

  औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना विषाणूने कहर केला आहे. पहिली व दुसरी लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असतानाच शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने 61 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. येथील रुग्णांचा संसर्ग औरंगाबाद जिल्ह्यात होऊ नये, यासाठी नगर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरणा तपासणी केली जाणार … Read more

शहरातील 413 शाळांची घंटा आजपासून वाजणार

औरंगाबाद – तब्बल दीड वर्षांनंतर आजपासून औरंगाबाद मनपा क्षेत्रातील महापालिकेच्या व खासगी शाळा सोमवार (ता.चार ) पासून सुरू होणार आहेत. आठवीपर्यंत असणाऱ्या 393 तर आठवी ते बारावीपर्यंत असणाऱ्या 413 शाळा सुरू होणार आहेत. अशा 806 शाळा सुरू होणार आहेत. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार या शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने … Read more

अबब ! कोवीड कचरा संकलनासाठी प्रतिकिलो 100 रुपये

औरंगाबाद – रुग्णायांतील नियमित बायोमेडिकल वेस्टसाठी प्रतिबेड 5 रुपये तर वापरलेल्या पीपीई किट्स कचऱ्यासाठी 100 रुपये प्रतिकिलो एवढा दर मोजावा लागत आहे. कचरा संकलनाचा दर प्रति किलो 5 रुपयांवरून तब्बल 100 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचा मुद्दा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. कोरोनामुळे रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. जिल्हा रुग्णालयात अनेक … Read more

पर्यटन दिनाच्या जाहिरातीत शासनाला पर्यटन राजधानीचा विसर !

add

औरंगाबाद – आज 27 सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन आहे. यानिमित्त शासनाने सगळीकडे एक जाहिरात प्रकाशित केली आहे. परंतु यामध्ये शासनाला पर्यटन राजधानीचा विसर पडल्याने पर्यटन दिनाच्या जाहिरातीमधून पर्यटन राजधानीच गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज जागतिक पर्यटन दिनानिमित्त शासनाकडून प्रकाशित केलेल्या जाहिरातीत लिहिले आहे की, ‘पर्यटनाच्या सुवर्णसंधी, खुल्या … Read more