शहरात मार्च अखेरपर्यंत येणार दोन डबलडेकर बस

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरासाठी दोन इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस मार्चअखेरपर्यंत उपलब्ध होतील, अशी माहिती मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी गुरुवारी दिली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्मार्ट सिटी प्रशासनाला इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस खरेदी करण्याची सूचना केली होती. स्मार्ट सिटी ने बसेस खरेदी ची तयारी केली असली तरी दीड वर्षांची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले. पांडेय यांनी … Read more

डबल डेकर बसची औरंगाबादकरांना प्रतीक्षाच

bus

औरंगाबाद – शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी डबल डेकर इलेक्ट्रिक शहर बस सुरू करण्याची सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली आहे. त्यासाठी बेस्टची मदत घ्या, असेही ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईला जाऊन डबल डेकर बसची पाहणी केली. बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, तब्बल दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगण्यात आले. … Read more

गुंठेवारी योजनेला मनपाकडून पुन्हा मुदतवाढ

औरंगाबाद – शहरातील अनाधिकृत मालमत्ता गुंठेवारी योजनेत अधिकृत करून देण्याची योजना मनपाने सुरू केली आहे. शहरात किमान 1 लाखाहून अधिक अनाधिकृत मालमत्ता असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मनपाच्या नगररचना विभागाकडे फक्त पाच हजार फाईल दाखल झाल्या आहेत. या योजनेची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत होती. मात्र, प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आता 28 फेब्रुवारीपर्यंत गुंठेवारी … Read more

डबल डेकर बस असेल ‘ओपन रुफ’

bus

औरंगाबाद – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने डबल डेकर बस ओपन ग्रुपच्या म्हणजे छत नसलेल्या घेण्याची तयारी सुरू केली आहे. या कामासाठी मुंबईच्या बेस्ट संस्थेची मदत घेतली जाणार आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने मागील काही दिवसांपासून ही बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. बस खरेदीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पर्यटनमंत्री आदित्य … Read more

शहरात इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरू करा

औरंगाबाद – मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात पर्यावरण पूरक डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. महापालिकेने पर्यावरण पूरक बस साठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. … Read more

जगातील टॉप पाच शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश

Aurangabad cycle track

औरंगाबाद – गुंतवणूक आणि उत्पादन वाढीच्या दृष्टीने नवीन विकसनशील शहरांची ओळख करून देणार्‍या ‘ग्ली स्टेटी जनरली- इनोव्हॅझिओन- मॅक्रोइकॉनॉमिया’ इटालियन मासिकाने नाविन्यपूर्ण उत्पादनाच्या जगातील पाच महत्त्वाच्या शहरात औरंगाबादला स्थान दिले आहे. औरंगाबाद सोबतच चीनमधील बीजिंग-टियांजिन, मुंबई, दक्षिण कोरियातील सेऊल, अमेरिकेतील बोस्टन आणि जर्मनीतील ड्रेस्डेन ही शहरे या यादीत आहेत. ‘इनोव्हॅझिओन’च्या मते ही शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध … Read more

औरंगाबादकरांसाठी खुशखबर! स्मार्ट शहर बससेवा उद्यापासून होणार सुरू; ‘या’ मार्गांवर धावणार बस

smart city bus

औरंगाबाद – औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे प्रवाश्यांच्या सेवेसाठी स्मार्ट शहर बस सेवेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त 23 जानेवारी म्हणजेच उद्यापासून शहर बससेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. यावेळी अनुभवी माजी सैनिक चालक आणि वाहक ह्यांचाद्वारे सेवेचा संचालन होईल. स्मार्ट शहर बस ही ए. एस. सी. डी. सी. एल. औरंगाबाद आणि रा. प. महामंडळात झालेल्या करारानुसार रा. प. … Read more

चंदीगड, हैद्राबाद ला मागे टाकत देशात औरंगाबाद 11व्या स्थानी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – स्मार्ट सिटीज मिशनने सोमवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. चॅलेंज जिंकून औरंगाबादने नवी दिल्ली, चंदीगड, हैदराबाद, सुरत, जयपूर, भोपाळ, नाशिक आणि ठाणे या मोठ्या शहरांना मागे टाकले आहे. या विजयासाठी औरंगाबाद शहराला 50 लाखांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. रस्त्यांवर चालणे सर्वांसाठी अनुकूल, सुरक्षित आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या उद्देशाने भारत … Read more

ऐतिहासिक मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनाचे काम अखेर सुरू

औरंगाबाद – शहरातील ऐतिहासिक मेहमूद दरवाज्याच्या नूतनीकरणाचे काम अखेर सुरू झाले आहे. स्मार्ट सिटी अभियानातून सुमारे 38 लाख रुपये खर्च करून या दरवाजाला गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. चार महिन्यात नूतनीकरणाचे काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अभियानातून शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्वात … Read more

गुलमंडी ते पैठणगेट वाहन बंदीचा प्रयोग

paithan gate

औरंगाबाद – शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पैठण गेट गुलमंडी पर्यंतचा रस्ता काही दिवस प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पीपल फॉर उपक्रम राबविण्यात येणार असून मंगळवारी या भागातील व्यापार आन सोबत चर्चा करण्यात आली. या रस्त्यावर दिल्लीतील ‘चांदणी चौका’ प्रमाणे पायी फिरून खरेदी करता येणार आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयातर्फे देशभरातील … Read more