सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ‘सह्याद्री’वर खलबते

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी अनेकांनी फिल्डींग लावलीय. उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांकडून सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर अनेकांकडून भेट घेत मागणी केली जात आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु … Read more

अतिवृष्टीच्या आसमानी संकटात सरकार जावलीच्या मदतीला कर्तव्यबद्ध : ना. बाळासाहेब पाटील

जावली | सातारा जिल्ह्यातील अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील वाई, पाटण, महाबळेश्वर तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे तीन तालुक्यामध्ये भूस्खलनाने मोठी जीवित व आर्थिक नुकसान केले आहे. सातारा जिल्ह्यावरील आसमांनी संकटात राज्याच्या महाविकास आघाडी सरकार कडून दुर्गम जावलीच्या मदतीला कटीबद्ध असल्याची ग्वाही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जावली येथील रेगडी येथे भेटी दरम्यान पत्रकारांशी … Read more

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन सकारात्मक – शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानीही झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोयनानगरला येऊन दुर्घटनाग्रस्थांची भेट घेतली जाणार होती. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना परत मुंबईला परतावे लागले. यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी कोयनानगर येथे पत्रकार परिषद घेतली. या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांचे लवकरात लवकर … Read more

मिरगावला भूस्खलनाचा फटका : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतली जखमींची भेट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मिरगाव येथे झालेल्या भूस्खलनामध्ये 12 लोक मातीच्या ढिगाऱ्यखाली गेले असून काहीजण जखमी झाले आहेत.  या जखमी झालेल्या पुरुष, महिला, युवक, युवती यांना हेळवाक येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  जखमी लोकांची दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन भेट घेतली. तसेच … Read more

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नाबार्डकडून उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्काराने सन्मान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हा बँकेने सातत्याने बँकिंग व नॉन बँकिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे बँकेस उत्कृष्ठ कार्यक्षमतेबद्दल नाबार्डच्यावतीने उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण ऑनलाईन पद्धतीने केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनिल माने, बँकेचे जेष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे … Read more

RSS च्या स्वयंसेवकांनी गणवेशात येऊन सेवा देऊ नये; पालकमंत्री पाटीलांचा नाव न घेता संघावर निशाणा

कराड : शासकिय रुग्णालयात लसीकरण मोहिमेवेळी गणवेश परिधान करुन सेवा बजावणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर युवक काँग्रेसने 10 मे रोजी आक्षेप घेतला होता. तसेच रा.स्व.से. च्या स्वयंसेवकांकडून गणवेश परिधान करुन पोलिटीकल अजेंडा राबवण्याचे काम केले जात आहे असा आरोप केला होता. आता यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही उडी घेतली आहे. शासकिय रुग्णालयात कोणत्याही संघटनेच्या … Read more

सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढवला; शिवजयंती, रमजान ईद आणि अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

balasaheb patil

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो रोखण्यासाठी सद्यस्थितीत चालू असलेले निर्बंध 15 मे पर्यंत तसेच ठेवण्यात आले असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. तिथीप्रमाणे शिवजयंती, रमजान ईद आणि अक्षय तृतीया या सणाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन राहणार आहे. सातारा जिल्ह्यात दिनांक 14, 19, 20 व 22 एप्रिल रोजी दिलेले आदेश 10 मे 2021 … Read more

कारखान्यांची आरआरसी केली नाही तर “धमाका” करणार ; राजू शेट्टी यांचा इशारा

raju shetty 1

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ज्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्यांची आरआरसी करायला आम्ही तयार आहोत, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ५ एप्रिल पर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही. तर यापूर्वी झाला नाही, असा धमाका गनिमीकाव्याने करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कराड येथे … Read more

शेतकऱ्यांना एफआरपी नाही, महावितरणचे पठाणी व्याज मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं – राजू शेट्टी आक्रमक

raju shetty

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हैराण झाला आहे, त्यांच्या पिकांचे हजारो- कोटींचे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळत नाही, उसाची एफआरपी जवळपास साडेतीन हजार कोटी थकित आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभरापूर्वी सानुग्रह अनुदान ५० हजार रूपये दिले जाणार होते, ते अजून सरकारने दिलेले नाही. शेतकऱ्यांनी दोन लाखांपेक्षा जास्त असलेली कर्ज … Read more

सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांच्या सह्याद्री कारखान्यानेच एफआरपीचा नियम मोडला; राजु शेट्टींचा आंदोलनाचा इशारा

raju shetty balasaheb patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील अनेक कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेना आक्रमक झाली आहे. मागील आठवाड्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्यावर आंदोलन केल्यानंतर आता सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. खुद्द सहकार मंत्र्यांनी च शेतकऱ्यांची … Read more