कर्नाळा बँकेच्या संचालकांची जप्त मालमत्तांचा लिलाव करून पैसे देण्यात येणार – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते , असे लेखी उत्तर सहकार मंत्री मा.नामदर बाळासाहेब पाटील यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले. पनवेल तालुक्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदार व खातेदारांना तातडीने पैसे परत मिळण्याबाबत … Read more

..तर आम्हाला तुमचा राजीनामा मागावा लागेल ; ऊस एफआरपी वरून सदाभाऊ खोत यांचा सहकारमंत्र्यांवर निशाणा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | सातारयातील कोरेगाव तालुक्यात जळगाव येथे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वीजबील माफी आणि ऊसाची FRP या प्रमुख मुद्द्यावर सदाभाऊ खोत यांनी शेतकरी मेळाव्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना इशारा दिला आहे..येत्या 15 दिवसात ऊसावरील FRP ची … Read more

बाळासाहेब पाटलांनी विलासराव पाटील उंडाळकरांच्या निधनावर व्यक्त केल्या सहवेदना, म्हणाले…

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर काका यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत. राज्याचे सहकार आणि पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही … Read more

सहकार मंत्रीच उसाचा दर जाहीर करू देत नाहीत; साखर कारखाने मंत्र्यांचेच – रघुनाथदादांचा आरोप

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड :- साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर केलेले नाहीत तसेच त्याबाबत स्पष्टता नाही. भाव कमी देण्याची प्रथा पडायला लागलेली आहे. एफआरपीही देत नाहीत. ज्याच्या ताब्यात साखर कारखाने आहेत, तेच सरकार चालवत आहेत. त्यामुळे या बेकायदेशीर वागणार्‍या कारखान्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. असा गंभीर आरोप रघुनाथदादा पाटील यांनी “हॅलो महाराष्ट्रशी” बोलताना केला आहे. तसेच … Read more

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ; दिग्गज नेत्यांच्या बैठकीनंतर एकमताने निर्णय

पुणे । ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसंच या निर्णयाबाबत सर्वांच एकमत झाल्याने सर्व ऊसतोड संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीला … Read more

मंञी महोदयांमुळेच २० वर्षे हणबरवाडी धनगरवाडी योजना रखडली – मनोज घोरपडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मंञी महोदयांनी हणबरवाडी धनगरवाडी योजनेबद्दल खोटी जाहिरात चालवली असून २० वर्षे ही योजना तुमच्यामुळेच रखडलेली आहे असा पलटवार कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे केला आहे. घोरपडे यांनी यावेळी राज्याचे सहकार व पनण मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर ताशेरे ओढलेत. गेली २० वर्षे योजना भाजपाने रखडवली असे म्हणता पण … Read more

एकनाथ खडसेंसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार? काय आहेत शक्यता जाणून घ्या

Eknath Khadse

मुंबई | भाजप नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकला आहे. खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश पक्का समजला जात आहे. एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्री करणार असल्याची चर्चा आहे. खडसे यांना मंत्रीपद द्यायचे झाले तर राष्ट्रवादीला एका विद्यमान मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातीप मंत्र्याला यासाठी राजीनामा द्यावा लागू शकतो अशी … Read more

सोयाबीन पिकाला राज्य शासनाने दिला ३८८० रुपये हमी भाव; १५ ऑक्टोबरपासून खरेदी केंद्र सुरु होणार

मुंबई । राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या काढणी आणि मळणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. अशा वेळी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य शासनानं यावर्षी सोयाबीनसाठीचा हमी भाव जाहीर केला आहे. राज्य शासन सोयाबीन पिकाला यावर्षी ३८८० रुपये हमी भाव देणार असल्याचे राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील सांगितलं आहे. याशिवाय १५ ऑक्टोबरपासून खरेदी केंद्र … Read more

हमी भावाने उडीद खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरुवात – बाळासाहेब पाटील

Balasaheb patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला दि.१ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाने उडीदसाठी हमी भाव प्रती क्विंटल ६ हजार रुपये जाहीर केला आहे. चालू हंगामात उडीद आवक बाजारात सुरु झाली आहे.

बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी दि. १५ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा. केंद्र शासनाकडे हमीभावाने उडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव दि.३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला होता त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Read more

मंत्री बाळासाहेब पाटील यांना मुंबईच्या ब्रिज कॅण्डी रुग्णालयात हलणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, बाळासाहेब पाटील यांना मुंबईच्या ब्रिज कॅण्डी रुग्णालयात हलणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पाटील यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली. ”बाळासाहेब पाटील … Read more