विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर होणार छ. शिवाजी महाराजांचा पुतळा

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वनस्पतिशास्त्र उद्यानात उभारण्यात येणार होता. 14 मे रोजी वनस्पती उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे भूमिपूजन अधिसभा सदस्य विजय सुबुकडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर हे भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. रिपाईचे युवक मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी या पुतळ्या संदर्भात आक्षेप घेतला … Read more

शिवप्रेमींसाठी खुशखबर…डॉ. बा.आं.म. विद्यापीठात उभारला जातोय छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत आहे. अनेक दिवसापासून पुतळ्याचे काम रखडले होते मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पुतळ्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाची सुरुवात झाली आहे मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बस विरोध दर्शवला आहे आणि पुतळ्याची … Read more

आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी धनंजय मुंडे, मेहबूब शेख आणि संजय राठोड यांचा कडेलोट केला असता – तृप्ती देसाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण विविध प्रकरणानी ढवळून निघाले. धनंजय मुंडे प्रकरण, नंतर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील बलात्काराचे आरोप आणि आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर येत आहे. यामुळे महाविकास आघाडीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी देखील या … Read more

चार वर्षाच्या चिमुरडीने घरी आणली शिवरायांची मूर्ती; शिवजयंती निमित्ताने महाराजांना अनोखी मानवंदना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कळवा ,ठाणे मधील एका चार वर्षाच्या चिमुरडीने शिवजयंती निमित्त शिवरायांना अनोखी मानवंदना दिली आहे. चार वर्षाच्या माहिकाने कुटुंबियांकडे हट्ट केला आणि छत्रपती शिवरायांची मूर्ती घरी आणून त्या मूर्तीवर पुष्पाभिषेक केला. करिश्मा आणि तिचे पती स्वप्निल माने यांची ही गुणी गोंडस अशी चार वर्षांची माहिका. माहिकाला छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल आतापासूनच प्रचंड … Read more

शिवजयंतीनिमित्त वीरेंद्र सेहवागचं खास ट्विट, म्हणाला…

मुंबई । आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivaji maharaj) यांच्या जयंतीनिमित्त विविध नेते, अभिनेते, खेळाडू छत्रपतींना अभिवादन करणारे ट्विट करत आहेत. भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) छत्रपतींना अभिवादन करणारं खास ट्विट केलं आहे तसेच महाराजांना आपल्या ट्विटमधून अभिवादन केलं आहे. वीरेंद्र सेहवागने शिवछत्रपतींच्या जयंतीदिनी खास ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सेहवागने म्हटलंय, … Read more

“छत्रपतींच्या तलवारी आज नसल्या तरी कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवनेरी । “छत्रपतींच्या तलवारी आज नसल्या तरी कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल” असल्याचं म्हणत मास्क वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘शिवजयंती दिनी’ राज्यातील जनतेला केलंय. राज्य सरकारकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021) साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार, छत्रपती संभाजीराजेही उपस्थित असून शिवप्रेमींचा … Read more

छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचेच ; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बरळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी मुंबई हा कर्नाटकचा भाग आहे असं अजब वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यानी बेताल विधान केले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कारजोळ यांनी थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हक्क दाखवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो शेअर करत कंगनाने केलं मराठीत ट्विट, म्हणाली..

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कंगनाने स्वतःला झाशीची राणी दाखवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचा फोटो शेअर करत मराठीत ट्विट केलं आहे. ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न … Read more

कोरोनाच्या छायेत किल्ले रायगडावर शिवप्रेमींविना शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

रायगड । कोरोनाच्या संकटामुळे यंदा किल्ले रायगडावर होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे रायगडावरून थेट प्रक्षेपण होणार होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या थैमानामुळे रायगड जिल्ह्याच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मोबाईल टॉवरसुद्धा पडले आहेत. रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त … Read more

कोरोनाच्या लढ्यात लता दिदींचा उद्धव ठाकरेंना आशीर्वाद; जिजाऊ-शिवबांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या..

मुंबई । ”शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्राने अनेक संकटाचा सामना केलेला आहे आणि मला खात्री आहे की कोरोनाच्या या संकटावरही महाराष्ट्र यशस्वीपणे मात करेल आणि तुमच्या नेतृत्वाखाली उतरोत्तर प्रगती करत राहील,” असं म्हणत लता दीदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी एका जुन्या मराठी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्यातील एका संवादाचा व्हिडिओ … Read more