पंतप्रधान मोदींनी पुण्यात केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे मेट्रोचे उदघाटन केले जाणार आहे. त्यासाठी मोदी पुणे येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता पंतप्रधान पुणे येथे दाखल झाले. यावेळी त्याच्या हस्ते महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात … Read more

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी युवक राष्ट्रवादीकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा निषेध

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन समाजात व्देषभावना निर्माण करणारे वक्तव्य करुन दोन्ही समाजाला भिडवण्याचा प्रयत्न केला आहे,अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी आज सांगली येथे व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस सांगली जिल्ह्याच्या वतीने आज … Read more

“भाजपकडून सरकार पाडण्याच्या प्रयत्नानंतर आता नेत्यांच्या बदनामीची मोहीम हाती”; जयंत पाटील यांची घणाघाती टीका

Jayant Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून ईडीच्या कारवाईवरून टीका केली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनाही अटक करण्यात आली आहे. सरकावर केल्या जात असलेल्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. ते प्रयत्न फसल्यानंतर आता … Read more

“भाजपच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे वाटतात, म्हणून…”; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी संसदेतील भाषणावेळी कोरोना हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे वाढला, अशी टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका करीत देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला. दरम्यान भाजप नेत्यांनी संसदेत महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरु असताना बाक वाजवले. यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे … Read more

“आजही रयतेच्या मनावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज” – डाॅ.अविनाश भारती

हॅलो महाराष्ट्र  | परभणी प्रतिनिधी भारताच्या इतिहासात अनेक राजे-महाराजे होऊन गेले. परंतु आजही रयतेच्या मनावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. जिजाऊमासाहेबांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केले. त्यांचा इतिहास केवळ वाचल्याने चालणार नाही,तर त्यांच्या विचारांचे आचरण विशेषतः तरुण पिढीने केले पाहिजे, शिवजयंतीच्या निमित्ताने मनाशी निर्धार करावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे, स्त्रियांचा … Read more

“जय भवानी” ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली; प्रकाश आंबेडकरांकडून ट्विट करत पुरावे सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जात आहे. या दरम्यान ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजा यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी एक ट्वीट असून ‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, असे … Read more

“आम्ही काय मराठ्यांच्या पोटचे नाहीत का?”; शिवजयंती कार्यक्रमात अजित पवार आक्रमक

Ajit Dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज किल्ले शिवनेरीवर शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नी महत्वपूर्ण विधान केले. “आम्ही सगळ्यांनी विधिमंडळात मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी भूमिका घेतली गेली. न्यायालयात अडचण आली म्हणून आयोग स्थापन करुन आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. सुप्रीम कोर्टात ते … Read more

शिवजन्मोत्सवाचा उत्साह; 10 हजार स्क्वे. फुटांच्या रांगोळीतून साकारली शिवछत्रपतींची प्रतिमा

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे शिवजन्मोत्सवा निमित्य परभणी जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध उपक्रम व कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवभक्त सज्ज झाले आहेत . यावेळी सेलू मध्ये हेलीकॉप्टर मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाथरी शहरामध्ये ज्ञानेश्वर बर्वे व इतर … Read more

“तलवार आजही आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा,”; राऊतांचा MIM ला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद शहरात महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारण्यावरून वाद सुरु झाला आहे. पुतळा उभारण्यास एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज याप्रकरणी इशारा दिला. “छत्रपती शिवाजी महाराज या देशाच्या शौर्याचे, राष्ट्रभक्तीचे, राष्ट्रवादाचे प्रतिक आहे. मोगलांविरुद्ध, आक्रमण कर्त्यांविरोधात त्यांची तलवार चालली, त्यांची तलवार आजही आमच्या हातात … Read more

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही – एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा मनपा आणि पोलीस प्रशासनाने हटवला. यानंतर अमरावती येथील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्याबाबत कुठलाही प्रकार … Read more