देशातील कोरोनाबाधीतांची संख्या १८ हजार ६०१ वर, ५९० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना बळींची एकूण संख्या आता १८,६०१ वर पोहोचली आहे.शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यातील १४,७५९ अद्यापही कोविड -१९ विषाणूमुळे पीडित आहेत. उपचारानंतर सुमारे ३२५१ रुग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे,परंतु मृतांचा आकडा मात्र ५९० वर पोहोचला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अंदमान आणि निकोबारमधील कोरोनाग्रस्त लोकांची संख्या आता १६ … Read more

पुण्यात रुबी हॉल क्लिनिकचे 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । करोना संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक धोकादायक जिल्हा बनलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स वॉर्डबॉय यांच्यासह २५ जणांना करोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बोमी भोट यांनी ही माहिती दिली. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये १९ नर्स आणि ३ डॉक्टरांचा समावेश आहे. त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ७५६ … Read more

दिलासादायक! ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केली आपलं राज्य करोनामुक्त झाल्याची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील बहुतांश राज्य कोरोनाशी झगडत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू व इतर राज्यात परिस्थिती गंभीर आहे. या राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशात गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपलं राज्य कोरोनमुक्त झाल्याची दिलासादायक माहिती दिली आहे. रविवारी गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. गोव्यामध्ये कोरोनाचे ७ … Read more

VIP संस्कृती! लेकीला घरी आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये भाजप आमदाराचा कारने २ हजार किमीचा प्रवास

नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये सर्व वाहतूक बंद असल्याचा फटका लाखो स्थलांतरित मजुरांना बसला. अनेक मजूर कल्पना येण्याच्या आत देशातील विविध शहरांमध्ये उपाशीपोटी राहण्यास मजबूर झाले. यांतील बहुसंख्य लाखो मजूर बिहार आणि उत्तरप्रदेश मधील आहेत. या मजुरांनी वारंवार विनवण्या करूनही दोन्ही राज्यांच्या सरकारांनी लॉकडाऊन आणि कोरोनासंसर्गाच्या धोक्यामुळं त्यांना घरी आणण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यान, अशा सर्व परिस्थितीत … Read more

देशातील ४५ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही

मुंबई । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत माहिती देणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली. आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी सांगण्यात आली. आकडेवारीनुसार देशातील काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचा सकारात्मक ट्रेंड समोर आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज … Read more

दिलासादायक! परभणीत ‘त्या’ कोरोनाग्रस्त तरूणाच्या संपर्कातील ४३ जणांच्या टेस्ट निगेटिव्ह

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे दोन दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये पाहुण्यांना भेटायला आलेला २१ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह सापडला होता. त्यानंतर ग्रीनझोन मध्ये असणाऱ्या परभणी शहरांमध्ये ३ दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी उशीरा सदरील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांपैकी ४३ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासन व आरोग्य विभागाला धीर मिळाला आहे. १६ एप्रिल … Read more

अन आल्प्स पर्वतावर झळकला तिरंगा; भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम

वृत्तसंस्था । भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. सर्वच देशांकडून या महामारीला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं कौतुक जगभरात होत आहे. अशातच भारताने कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना असताना जगातील अनेक देशांना मदत देखील केली आहे. भारताच्या या कामाचं कौतुक जगभर होत आहे. कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईचं कौतुक … Read more

भारतीय नौदलावर कोरोनाचा हल्ला; मुंबईत १५ ते २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । भारतीय लष्कारानंतर आता कोरोनाने नौदलातही शिरकाव केला आहे. मुंबईतील नौदलाच्या तळावरील १५ ते २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व नौसनिकांचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईतीलच नौदलाच्या रुग्णालयात या नौसैनिकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या किनाऱ्यावर … Read more

..तर यंदाचे टी-२० वर्ल्ड कप सामने मैदानातील प्रेक्षकांशिवाय होणार

वृत्तसंस्था । कोरोना संकटमुळे जगातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या असून यात ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेचा समावेश आहे. क्रीडा स्पर्धा कधी सुरू होतील हे आताच सांगता येणार नाही. मात्र, कोरोना संकट असताना देखील क्रिकेट ऑस्ट्रेलिया २०२०-२१च्या कार्यक्रमाबद्दल आशावादी आहे. यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचा समावेश आहे. तर भारतासोबतचा हाय व्होल्टेज … Read more

लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानला घेतलं फैलावर म्हणाले, जग करोनाशी लढतंय अन् तुम्ही..

वृत्तसंस्था । भारताचे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. सीमारेषेवरील परिस्थितीचा ते आढावा घेत आहे. यावेळी एएनआयशी बोलताना त्यांनी पाकिस्तानला चांगलंच फैलावर घेतलं. ”कोरोनाच्या संकटात आम्ही आमच्या लोकांची मदत करण्यात व्यस्त आहोत. फक्त आमच्या लोकांचीच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये वैद्यकीय मदत आणि औषधांचा पुरवठा करत मदतीचा हात देत आहोत. पण दुसरीकडे … Read more