शहराच्या एन्ट्री पॉईंटवरील कोरोना चाचण्या बंद, परंतु…

Antigen test

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिकेतर्फे दीड वर्षांपासून सहा एन्ट्री पॉइंटवर प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात होती. मात्र, खासगी बस चालकांसोबतचे वारंवारचे वाद, प्रवाशांमधून होणारा विरोध लक्षात घेता, महापालिकेने एन्ट्री पॉइंटवरील चाचण्या बंद केल्या आहेत. असे असले तरी शहराच्या इतर भागात गर्दीच्या ठिकाणी मात्र चाचण्या सुरूच आहेत. कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर इतर … Read more

मोठा दिलासा : सातारा जिल्ह्यात केवळ 47 कोरोना पाॅझिटीव्ह

Corona Newssatara

सातारा | सातारा जिल्ह्यात काल रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये केवळ 47 बाधित आढळले आहेत. कोरोना बाधितांचा आकडा सर्वात कमी आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला कोरोना बाधित तपासणीच्या अहवालात दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 936 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 47 लोक बाधित आढळून आले आहेत. तपासणीत केवळ … Read more

आरोग्य विभागाचा गोंधळ ! एकाच युवकाचा अहवाल परभणीत पॉझिटिव्ह तर जालन्यात निगेटिव्ह

Corona Test

परभणी – जिल्ह्यातील मानवत येथील युवकाचा कोरोना पॉझिटिव्ह तपासणी अहवाल प्रकारणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. परभणीच्या खासगी व जिल्हा शासकीय प्रयोगशाळेत कोरोना पॉझिटिव आलेल्या तरुणाने या अहवालाला आव्हान देत जालना येथील शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, त्या ठिकाणी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे‌‌. घशातील लाळेचा किंवा नाकातील नमुना न घेता केवळ मोबाईल क्रमांक … Read more

कोरोनाच्या अँटीजेनपेक्षा आरटीपीचीआर चाचणी विश्वासार्ह; मनपाचा अहवाल

corona virus

औरंगाबाद – महापालिकेने आजवर केलेल्या अँटिजन चाचण्यांपेक्षा आरटीपीसीआर चाचण्यांतून अधिक प्रमाणात पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीच अधिक विश्वासार्ह असल्याची माहिती औरंगाबाद पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी नुकतीच दिली. मार्च 2020 पासून ते आजपर्यंत औरंगाबाद महापालिकेने दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. यापैकी 91 हजार 932 नागरिकांचे अहवाल कोरोना … Read more

एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचण्यांत वाढ; पॉजिटीव्ह येण्याचे प्रमाण मात्र शून्य

corona test

औरंगाबाद – ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या भीतीने मनपा प्रशासनाने कंबर कसली असून, याच अनुषंगाने शहरच्या एन्ट्री पॉइंटवर चाचण्या वाढवल्या आहेत. यामुळे गेल्या आठवड्यात 7 हजार 86 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये एकही रुग्ण कोरोना बाधित आढळून आलेला नाही. असे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मांडलेला यांनी सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात … Read more

दिलासादायक ! सात हजार कोरोना चाचण्या; परंतु एकही पॉझिटिव्ह नाही

corona antijen test

औरंगाबाद | शहरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानुसार महापालिकेने शहराच्या सहा एंट्री पॉईंट वर कोरोना चाचण्या वाढवल्या असून तिसऱ्या लाटेत त्रुटी नको म्हणून प्रशासनाकडून तयारी आणि काळजी घेतली जात आहे. गेल्या पाच दिवसापासून 7 हजार 86 जणांच्या चाचण्या झाल्या आहेत आणि यामधून … Read more

कराडच्या तहसील कार्यालयात येणाऱ्या दीडशे जणांची कोरोना टेस्ट

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे प्रशासकीय कार्यालयात महत्वाच्या कामासाठीच नागरिकांनी यावे, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. मात्र, नागरिकांकडून कराडच्या प्रशासकीय कार्यालयात गर्दी केली जात असल्यामुळे कामाव्यतिरिक्त येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, कामानिमित्त कराड येथील प्रशासकीय कार्यालयात नागरिकांकडून गर्दी केली जात असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी … Read more

लग्नाला जाताय मग कोरोना टेस्ट, लसीकरण बंधनकारक : “या” जिल्हाधिकाऱ्यांनी काढले कडक आदेश

Marrage

सातारा | सातारा जिल्ह्यातील संचारबंदी व जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. निर्बंध काळात वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यापुर्वी लग्न समारंभासाठी 25 लाेकांना परवानगी हाेती. ती मर्यादा तशीच ठेवली असली तरी आता लग्नाला  येणाऱ्या सर्वांकडे काेविड 19 निगेटीव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर अत्यंविधीलाही केवळ 20 लोकांनाच … Read more

एक बाधित, अख्ख कुटुंब बाधित करतो ; तेव्हा वेळेवर लक्षणे ओळखून रुग्णालयात जाण्याचे पालकमंत्र्यांचे भावनिक आवाहन

सातारा | कोरोनाचा संसर्गाची लक्षणे असूनही काही रुग्ण पुढे येऊन तपासणी करत नाही, एका व्यक्तीमुळे आख्खेच्या आख्खे कुटुंब बाधित होत आहे. ज्या कोणाला कोरोची लक्षणे आढळल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी, असे भावनिक आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 ऑक्सिजन बेडचे कोविड … Read more

जतमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना अँटीजन टेस्टचा दणका, एकजण पाॅझिटीव्ह आल्याने खळबळ

corona test

सांगली | जत शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाणे व आरोग्य विभाग यांच्या संकल्पनेतून सकाळी फिरायला जाणाऱ्यांची अँटीजन चाचणी करण्यात आली. एकूण ३० नागरिकापैकी एक नागरिक कोरोनाबाधित आढळला. अँटीजन चाचणी होईल या भीतीने यावेळी काही नागरिकांनी धूम ठोकली. जत शहरात कोरणाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असुन मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी जत नगरपरिषदेने 10 … Read more