कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसाठी मोदीच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू मुळे जनतेची चिंता वाढली. त्यातच बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवत असून अपुऱ्या आरोग्य यंत्रणांमुळे सरकार हतबल झालं. यावरून देशातील सर्व विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं असून आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर 1 गंभीर आरोप केला आहे. कोरोना मुळे झालेल्या … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट?? तब्बल 8 हजार मुले कोरोनाबधित

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यातच आता राज्यातल्या अहमदनगर (Ahmednagar) मध्ये मे महिन्यात जवळपास 8 हजारहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे अहमदनगर नगर मध्ये तिसरी लाट आली की काय अशी शक्यता निर्माण झाली असून भीतीचे वातावरण आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत … Read more

‘या’ कारणामुळे ऋषभ पंतकडून काढून घेतले जाणार दिल्लीचे कर्णधारपद

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला होता. यामध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये युएई या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. शनिवारी बीसीसीआयने एक विशेष सभा घेऊन त्यामध्ये हा निर्णय … Read more

पाकिस्तानसोबतचे 1971 चे युद्ध केवळ 13 दिवसांत कसे जिंकले? तुमच्याकडे 7 मिनिटं असतील तर ‘हा’ Video पहाच

sam manekshaw

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1971 साली पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले होते. यादरम्यान संरक्षण पत्रकार सुशील शर्मा यांनी भारताचे आर्मी चिफ सॅम बहादूर यांची एक मुलाखत घेतली होती. यामध्ये आर्मी चिफ सॅम बहादूर यांनी पाकिस्तानसोबत हे युद्ध 13 दिवसांत कशाप्रकारे जिंकले हे सांगितले आहे. ती मुलाखत चांगली चर्चेत राहिली होती. ती मुलखात … Read more

खरंच… चीनमधील वुहान लॅबमधून पसरला कोरोना? साथीच्या आजारापूर्वी 3 कर्मचारी अचानक पडले होते आजारी

बीजिंग । जगभरात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार होऊन दीड वर्षांचा काळ झाला आहे, परंतु हा विषाणू कोठून आला याचे अचूक उत्तर अद्याप सापडलेले नाही. दरम्यान, अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होण्याच्या एका महिन्यांपूर्वीच चिनी इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (Wuhan Institute of Virology) चे तीन कर्मचारी आजारी पडले होते. … Read more

क्रिकेट विश्वातील रोमांचक आणि धमाकेदार अ‍ॅशेज कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर,जाणून घ्या

ashes series

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातील अ‍ॅशेज कसोटी मालिकाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. ह्या मालिकेची सर्व चाहत्यांना प्रतिक्षा लागून राहिलेली असते. हि मालिका सर्वात रोमांचक आणि धमाकेदार असते. ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हि मालिका वर्षाच्या अखेरीस होणार आहे. आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन्ही देशात होणाऱ्या पाच सामन्यांची तारीख आणि ठिकाणांची नावे … Read more

कोरोना काळात NTPC ने दिला मदतीचा हात, कोविड केअर सेंटर्समध्ये जोडले 500 ऑक्सिजन बेड्स

नवी दिल्ली । देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे हाहाकार उडाला आहे. कोरोनाविरूद्धच्या युद्धात देशातील अनेक कंपन्या मदत-आघाडीवर व्यस्त आहेत. दरम्यान, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (NTPC) देशभरातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये 500 हून अधिक ऑक्सिजन-समर्थित बेड्स आणि 1,100 आयसोलेशन बेड्स जोडले आहेत, ज्यामुळे कोविड -19 विरूद्ध लढा देण्यात मोलाचा वाटा आहे. NTPC ने शनिवारी एका निवेदनात म्हटले … Read more

महाराष्ट्राला काहीसा दिलासा! कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात घट झाली असून 39923 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या म्हणता येईल. तसेच राज्यात आज 695 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणता येईल. आज राज्यात 39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. … Read more

भारत लढणार आणि जिंकणारही ; मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील साडे नऊ कोटींहून अधिक शेतकर्‍यांना ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ अंतर्गत आठवा हप्ता प्रदान करण्यात आला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानसिक आधार दिला. भारताचं अद्यापही करोनाशी युद्ध सुरू असून आपण हे युद्ध लढणार आणि जिंकणारही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोविड रुग्णांचं … Read more

कोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

modi and shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहेत. अनेक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अशातच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी करोना विषाणूसंदर्भात एक विचित्र वक्तव्य केलं आहे. त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले, कोरोना व्हायरस … Read more