अखेर आयपीएल फायनलचा ‘मुहूर्त’ ठरला ! जाणून घ्या कधी सुरु होणार स्पर्धा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. यामुळे आता उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्यात येणार असल्याचे बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या आयपीएलचे 29 सामने झाले आहेत तर उर्वरित 31 सामने युएईमध्ये होणार आहेत. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे उरलेले सामने सुरू होतील, तर फायनल दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजेच 15 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. मागची आयपीएल कोरोना व्हायरसमुळे युएईमध्ये खेळवण्यात आली होती.

‘आयपीएल पूर्ण करण्यासाठी आम्हाला 25 दिवसांची गरज आहे. युएई बोर्डासोबतची बैठक चांगली झाली. ते आयपीएलचं आयोजन करण्यासाठी तयार आहेत. 19 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल. सगळे सामने शारजाह, दुबई आणि अबुधाबीमध्ये होतील.’ असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. उर्वरित आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंच्या सहभागाबाबत साशंकता आहे, पण आम्ही त्यांच्या बोर्डाशी चर्चा करत आहे. त्यांच्याकडूनही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या दिल्लीची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. या आयपीएलमध्ये दिल्लीने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. जर आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले नाहीतर तर बोर्डाला 2500 कोटींचे नुकसान होणार आहे असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या अगोदरच स्पष्ट केले आहे.

Leave a Comment