कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील ‘हे’ नामांकित क्लॉथ सेंटर सील

औरंगाबाद – कोरोना नियमावलीचे पालन करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने जालना रोडवरील आकाशवाणी चौकातील नामांकित कापडाचे दालन राज क्लॉथ आज दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान सिल केल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सहाय्यक कामगार उपायुक्त वाय. एस. पडीयाल, मनपा झोन क्रं. 9 चे अधिकारी संपतराव दराडे … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : मकरसंक्रांती सणामुळे माण तालुक्यातील धार्मिक स्थळांवर संचारबंदी लागू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला लक्षात घेता मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने नविन आदेश दिले आहेत. मकरसंक्रांती निमित्त माण तालुक्यात सुमारे 1 ते दीड लाख महिला या माण तालुक्यातील विविध धार्मिक ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात. त्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून माण तालुक्यातील स्थानिक प्रशासनाला … Read more

प्रशासन यंत्रणा सज्ज : कराडला दोन ऑक्‍सिजन प्लांट सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोविडचा फैलाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने बेडसह अन्य यंत्रणेची सज्जता ठेवली आहे. कोविडचे रुग्ण वाढल्यावर त्यांचे ऑक्‍सिजन कमी येते. मध्यंतरी ऑक्‍सिजन न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावे लागले. त्याचा विचार करून प्रशासनाने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन प्लांट कार्यान्‍वित केला आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या वाढत्या ऑक्‍सिज ऑक्‍सिजनच्या बाबनची … Read more

कोरोनाचे मृत्युसत्र थांबले ! मात्र नव्या रुग्णात मोठी वाढ

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेचारशेच्या जवळ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 484 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 410 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 74 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 519 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. … Read more

महापालिकेने बजावल्या शहरातील 12 रुग्णालयांना नोटिसा

aurangabad mahanagar

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या लेखा परीक्षणानंतर हा प्रकार समोर आला होता. जास्तीचे उकळलेले शुल्क परत देण्यासाठी या रुग्णालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. पण त्यानंतरही पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने महापालिकेने अशा 12 रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. … Read more

खंडोबाची यात्रा रद्द : महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या “या” गावात संचारबंदीचे आदेश

Khandoba Pali

उंब्रज | महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबाची शनिवार दि. 15 जानेवारी रोजी होणारी यात्रा जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली. दरम्यान, खंडोबाचे सर्व धार्मिक विधी, रुढी, परंपरा या स्थानिक पातळीवर खंडोबाचे प्रमुख मानकरी, कारखान्याचे मानकरी अशा फक्त 50 जणांच्या उपस्थितीत होणार आहेत. याबाबत … Read more

मनपा प्रशासकांसह 60 कर्मचाऱ्यांना ‘बुस्टर’ तर दिवसभरात 640 जणांनी घेतला डोस

vaccine

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधक लसचा प्रिकॉशन डोस काल सकाळी अस्तिक कुमार पांडेय यांच्यासह मनपाच्या 60 कर्मचाऱ्यांना देण्यात आला. आज ही विशेष बाब म्हणून मनपा मुख्यालयात डोस देण्यात येणार आहे. मनपातर्फे 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येत आहे. ज्यांचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेले आहेत, अशाच लाभार्थींना हा डोस देण्यात येत … Read more

कोरोनाचा आलेख वाढताच ! आज कोरोनाने गाठला 350 चा टप्पा

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज तब्बल साडेतीनशेच्या जवळ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 349 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 285 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 64 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 448 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी … Read more

कोरोना रोखण्यासाठी मनपाचा 15 कलमी कार्यक्रम

औरंगाबाद – कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्जझाले असून, पंधरा कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. जास्तीत जास्त रुग्ण गृह विलगीकरणात राहणार आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असेल, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. कोरोना उपाययोजनांबाबत पांडेय म्हणाले, की ज्या हेल्थ केअर वर्करने लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नाही … Read more

शहरातील 9 वी ते 12वी पर्यंतचे वर्ग बंद

औरंगाबाद – शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अस्तित्व कुमार पांडेय यांनी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे सर्व वर्ग बंद करण्याचा आदेश काल जारी केले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सुरू असलेल्या अभ्यासिका देखील बंद करण्यात आल्या. रविवारी शहरात 181 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले … Read more