दिलासादायक ः आ. शिवेंद्रसिंहराजे व सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या प्रयत्नातून 80 बेडचे कोव्हीड सेंटर सज्ज

Satara Vedantikaraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरासह जिल्ह्यातील भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी पुष्कर मंगल कार्यालयात पुन्हा कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुष्कर कोव्हीड सेंटरमध्ये ३२ ऑक्सिजनयुक्त बेडसह ८० बेडचे केअर सेंटर पुन्हा … Read more

सत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडून कोरोना सेंटरला 1 लाख 25 हजारांचे अर्थसहाय्य

कराड प्रतीनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावू नये. याकरिता सत्यजितसिंह पाटणकर यांनी यावर्षीही रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना केअर सेंटरला 25 ऑक्सिजन सिलेंडरसाठी 1 लाख 25 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. सत्यजित पाटणकर यांनी बांधिलकी म्हणून गतवर्षीही सेंटरला नवीन … Read more

महापालिका करणार १ कोटी ४४ लाख रूपयांच्या खाटांची खरेदी

औरंगाबाद | नव्याने सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटर्ससाठी महापालिका १ कोटी ४४ लाख रुपयांच्या खाटा खरेदी करणार आहे. या बाबतची प्रक्रिया सुरू झाली, असून निविदा काढून गरजेनुसार खाटा उपलब्ध करुन घेतल्या जातील. कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मार्चमध्ये या लाटेने रौद्ररुप धारण केले. रोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण शहरात आढळून येत आहेत. त्यामुळे नवीन कोविड … Read more

मेल्ट्रॉन हॉस्पिटलसाठी पालिकेच्या बजेटमध्ये 15 कोटींची तरतूद

औरंगाबाद | गतवर्षी राज्य सरकारने कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कंपनीच्या जागेत कोवीड हॉस्पिटल विकसित करून ते चालवण्यासाठी महापालिकेला दिले. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून आजवर या हॉस्पीटलवर शासन निधीतून खर्च केला जात आहे. मात्र आता यासाठी यंदा पालिकेने बजेटमध्ये 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोरोनासोबतच साथ रोग चिकित्सा व निर्मुलन हॉस्पिटल येथे विकसित … Read more

राजकीय दबावतंत्रामुळे प्रशासनाकडून मंगल कार्यालये ताब्यात घेण्यास उशीर

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्ग वाढत असताना रूग्णांना उपचार सेवा देण्यासाठी महापालिकेने कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची घोषणा केली होती. मात्र पंधरा दिवस उलटले तरी प्रशासनाकडून मंगल कार्यालये ताब्यात घेण्यास उशीर केला जात आहे. अद्याप एकही मंगल कार्यालय ताब्यात घेण्यात आले नसून प्रशासनावर राजकीय दबाव आणला जात आहे. त्यामुळे प्रशासन हतबल झाल्याचे … Read more

कोरोना रूग्णाचे हाल : आरोग्य केंद्र बंद, रूग्णवाहिका नाही

औरंगाबाद । पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील एक तरूण काल केलेल्या कोरोना तपासणीत पाॅझिटिव्ह आढळून आला. मात्र त्या पाॅझिटिव्ह रूग्णाला रूग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे त्याला चक्क आपल्या दुचाकीवरून चितेगाव कोवीड सेंटर गाठावे लागले. ढाकेफळ येथील एका तरुणाचा कोवीड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे काल सायंकाळी उशिरा माहिती मिळताच त्याने ढाकेफळ येथिल प्राथमिक … Read more

जिल्ह्यात आणखी नऊ कोविड केअर सेंटर सुरू, जिल्हा परिषद आरोग्य विभागाची माहिती …

औरंगाबाद | शहरात दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हा परिषद विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात आणखीन नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत दोन हजार 400 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दर दिवशी तीनशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. यात … Read more

मेल्ट्रॉनच्या कोविड सेंटरमध्ये अपुरा औषध साठा, रूग्णांना बाहेरून आणावी लागत आहेत औषधे; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

औरंगाबाद | चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या कोवीड केअर सेंटरमध्ये औषधी उपलब्ध नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी विकत आणावी लागत असल्याने तात्काळ या सेंटरवर औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोनाचे रुग्ण वाढताच रेमडेसेवीर इंजेक्शनच्या मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत आली होती. शहरातील अनेक रुग्णालयांना या … Read more

कोविड सेंटरमध्ये खाटाच शिल्लक नाही; घरीच उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

औरंगाबाद | शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेचे कोविड केअर सेंटर फुल्ल झाले आहेत. या सेंटरमध्ये खाटा शिल्लक नाहीत. त्यामुळे उपचारासाठी कोविड केअर सेंटरकडे येणाºया बाधितांना औषध देऊन घरी पाठवण्यात येत असल्याचे काही बाधितांच्या नातेवाइकांच्या सांगण्यावरून स्पष्ट झाले आहे. शहरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वाढू लागली आहे. पाच-सहा दिवसांपासून तर रोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण … Read more

कोवीड सेन्टरमध्ये कोरोनाबाधित रुग्णासोबत सेक्सप्रकरणी नर्सचे निलंबन; सेक्ससाठी फाडला पीपीई सूट

जकार्ता । इंडोनेशियाची राजधानी असणाऱ्या जकार्तामधील कोरोना केंद्रात असणाऱ्या व्यक्तीने येथील एका नर्ससोबत शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक खुलासा सोशल नेटवर्किंगवरुन केला. या व्यक्तीने सोशल नेटवर्किंगवर नर्स आणि आपल्यामध्ये नक्की काय काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती तसेच व्हिडीओही पोस्ट केला. त्यानंतर या दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअप चॅटचे काही स्क्रॉनशॉर्टही या तरुणाने सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केले आहेत. या व्यक्तीने … Read more